

Vande Bharat Express 20 Coach
ESakal
मुंबई : मुंबई सेंट्रल टर्मिनसवरून धावणाऱ्या ‘वंदे भारत’ गाड्यांपैकी आणखी एका गाडीचा रेक १६ डब्यांवरून २० डब्यांचा करण्याची तयारी पश्चिम रेल्वेने केली आहे. दरम्यान, २० डब्यांच्या दुसऱ्या ‘वंदे भारत’ गाडीकरिता आवश्यक इतका लांब प्लॅटफॉर्म उपलब्ध नसल्याने मुंबई सेंट्रलहून सुटणारी कर्णावती एक्स्प्रेस आता वांद्रे टर्मिनस येथून चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.