

Mumbai Local Train SARAL Scheme
ESakal
मुंबई : ऑनलाइन किंवा मोबाईल ॲपवरून रेल्वे तिकीट काढताना अनेकदा बँक खात्यातून पैसे कट होतात; मात्र तिकीट मिळत नाही, अशी तक्रार प्रवासी वारंवार करतात. अशा वेळी तक्रार नोंदवण्यासाठी रेल्वे स्थानकात जाऊन प्रक्रिया पूर्ण करावी लागत असल्याने प्रवाशांचा वेळ आणि त्रास वाढत होता. ही अडचण लक्षात घेऊन पश्चिम रेल्वेने ‘स्मार्ट असिस्टन्स अँड रिफंड ॲक्सेस लिंक (सरल)’ ही नवी डिजिटल सेवा सुरू केली आहे.