Mumbai Suburban Rail: मुंबईत रेल्वे तिकिटांसाठी थर्मल प्रिंटरचा वेगवान प्रयोग; उष्ण दमट हवामानात मजकूर फिका पडण्याच्या धोक्याने प्रवाशांची चिंता

थर्मल प्रिंटरमुळे तिकीट छपाईला वेग, पण उष्ण-दमट हवामानात मजकूर फिका पडण्याच्या शक्यतेने प्रवाशांची वाढती चिंता
Western Railway introduces thermal ticket printing, raising concerns over ticket durability.

Western Railway introduces thermal ticket printing, raising concerns over ticket durability.

sakal
Updated on

नितीन बिनेकर

मुंबई : पश्चिम रेल्वेच्या मुंबई विभागाने तिकीट छपाईसाठी डॉट मॅट्रिक्स प्रिंटरऐवजी थर्मल प्रिंटरचा वापर टप्प्याटप्प्याने सुरू केला आहे. आतापर्यंत २६५ थर्मल प्रिंटर, म्हणजेच सुमारे ३५ टक्के प्रिंटर बसविण्यात आले असून ऑक्टोबर २०२७ पर्यंत सर्व तिकीट खिडक्यांवर थर्मल प्रिंटर कार्यान्वित करण्याचे उद्दिष्ट आहे. रेल्वेच्या मते, या बदलामुळे तिकीट छपाईचा वेग वाढेल, देखभाल खर्च कमी होईल आणि तिकीट वितरण व्यवस्था अधिक कार्यक्षम बनेल. मात्र, मुंबईसारख्या उष्ण व दमट हवामानात थर्मल तिकिटांच्या टिकाऊपणाबाबत प्रवासी संघटनांनी चिंता व्यक्त केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com