पश्चिम रेल्वे मार्गांवर आणखी १५ डब्याच्या लवकरच ६७ फेऱ्या! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

western railway

पश्चिम रेल्वेने नुकताच बारा डब्ब्यांची लोकल आता १५ डब्यांचा लोकलमध्ये परावर्तीत करून पंधरा डब्याचा २६ लोकल पश्चिम मार्गावर धावायला सुरुवात झाली.

Western Railway : पश्चिम रेल्वे मार्गांवर आणखी १५ डब्याच्या लवकरच ६७ फेऱ्या!

मुंबई - पश्चिम रेल्वेने नुकताच बारा डब्ब्यांची लोकल आता १५ डब्यांचा लोकलमध्ये परावर्तीत करून पंधरा डब्याचा २६ लोकल पश्चिम मार्गावर धावायला सुरुवात झाली. आता आणखी १५ डब्यांच्या ६७ लोकल फेऱ्या वाढविण्याचा निर्णय़ घेतला आहे. या वाढीव फेऱ्या टप्याटप्याने चालविण्याचे नियोजन पश्चिम रेल्वेने केले आहे. त्यामुळे आता पश्चिम रेल्वे मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा लोकल प्रवास खऱ्या अर्थाने गर्दी मुक्त होणार आहे.

पश्चिम रेल्वे मार्गावरील लोकलच्या डब्यातून कायम दाटीवाटीचा आणि असह्य वाटणारा प्रवास करावा लागत होता. इतकेच नव्हे तर,गेल्या काही दिवसांपासून लोकलमधील जागेवरून प्रवाशांमध्ये हाणामारीचा घटना सुद्धा वाढलेल्या आहे. या पार्श्वभूमीवर पश्चिम रेल्वेने उपनगरीय लोकल सेवाची आसन क्षमता वाढविण्याचा निर्णय घेतला होता. त्यानूसार २१ नोव्हेंबर २०२२ पासून बारा डब्ब्यांची लोकल १५ डब्यांचा लोकलमध्ये परावर्तीत करून पंधरा डब्याचा २६ लोकल पश्चिम मार्गावर धावायला सुरुवात झाली. त्यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळालेला आहे.या नवीन फेऱ्यांची भर पडल्याने पंधरा डब्याच्या लोकलच्या फेऱ्यांची एकूण संख्या १०६ वरून १३२ झाली.

पश्चिम रेल्वेच्या एका वरीष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार येत्या काही महिन्यात आणखी बारा डब्ब्यांची लोकल पंधरा डब्यांचा लोकलमध्ये परावर्तीत करून आणखी ६७ फेऱ्या वाढवण्याचे नियोजन केले आहे. या वाढीव फेऱ्या टप्याटप्याने चालविण्यात येणार आहे. त्यामुळे लोकलच्या आसन क्षमतेत अंदाजित ५० टक्यांची वाढ होणार आहे.

मध्य रेल्वेत सुधारणा केव्हा?

जागेवरून महिला प्रवाशांची मारामारीची घटना घडल्यानंतर पश्चिम रेल्वेने महिला डब्यांची आसन क्षमता वाढवली. आता प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन १५ डब्याचा फेऱ्यांची संख्या वाढविण्यात येत आहे. मध्य रेल्वेनेही पश्चिम सारख्या निर्णय घ्यावा जेणेकरून मध्य रेल्वेवरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा प्रवास गर्दीमुक्त होईल अशी प्रतिक्रिया प्रवासी वर्गातून आहे.

-१९८६ मध्ये १२ डब्यांची लोकल सेवा

- २००९ मध्ये १५ डब्यांची लोकल सेवा जलद मार्गांवर सुरू

-२५ डिसेंबर २०१७ रोजी पहिली एसी लोकल

- २८ जून २०२१- अंधेरी ते विरार दरम्यान पंचवीस १४ डब्यांची लोकल सेवा