

Western Railway Mumbai Local Disruption
ESakal
मुंबई : आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सकाळच्या सुमारास मुंबई लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे हाल झाल्याची माहिती समोर आली आहे. पश्चिम रेल्वे मार्गावरील नालासोपारा आणि विरार स्थानकांदरम्यान सिग्नल यंत्रणेत अचानक तांत्रिक बिघाड झाला. परिणामी लोकल ट्रेनची वाहतूक विस्कळीत झाली असून कामासाठी किंवा फिरायला जायला निघालेल्या प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागला.