पश्‍चिम रेल्वे शौचालयांना खासगी कंपन्या प्रायोजक

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 4 नोव्हेंबर 2016

प्रवाशांना नॅपकिन, हॅण्ड ड्रायरची सुविधा
मुंबई - पश्‍चिम रेल्वेच्या उपनगरी स्थानकांवरील शौचालयांचा कायापालट करण्यासाठी आता कंपन्यांची मदत घेतली जाणार आहे. कंपन्यांनी सामाजिक उत्तरदायित्व (सीएसआर) निधीतून काही शौचालयांचा दर्जा सुधारण्याचे ठरवले आहे. "पे ऍण्ड यूज' या तत्त्वावरच ही शौचालये असतील, असे पश्‍चिम रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक मुकुल जैन यांनी "सकाळ'ला सांगितले.

रेल्वेस्थानकांवरील सार्वजनिक शौचालयांतून असह्य दुर्गंधी येते. त्यामुळे पश्‍चिम रेल्वेने कंपन्यांच्या मदतीने शौचालयांत सुधारणा करण्याचा निर्णय घेतला आहे. दोन-तीन कंपन्यांबरोबर बोलणी झाली असून प्राथमिक टप्प्यात अंदाजे 20 स्थानकांतील शौचालयांची सुधारणा करण्यात येईल.

सीएसआर निधीचा वापर करण्यासाठी कंपन्यांना स्थानकावर प्रवाशांना बसण्यासाठी बाके, कचराकुंडी, कॉम्पॅक्‍टर, बायो-वेस्ट डिस्पोजल हे पर्यायही देण्यात आले आहेत. रोटरी क्‍लब ऑफ इंडियाबरोबर पश्‍चिम रेल्वेची बोलणी सुरू आहेत. "या शौचालयांत काटेकोर स्वच्छता ठेवली जाईल. नॅपकिन, हॅण्ड ड्रायर व इतर सुविधाही असतील' असे जैन यांनी सांगितले.

लघुशंकेसाठी एक रुपया
सीएसटी स्थानकातील सार्वजनिक शौचालयाबाहेर लावलेल्या फलकावर पुरुषांकडून लघुशंकेसाठी एक रुपया घेण्याचे जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे या मुद्द्यावर पुन्हा कंत्राटदार व प्रवाशांमध्ये शाब्दिक चकमकी झडण्याची शक्‍यता आहे.

Web Title: Western Railway toilets Private companies sponsor