'जेईई'-'नीट'च्या विद्यार्थ्यांसाठी पश्चिम रेल्वेही सरसावली; अतिरिक्त ट्रेन सोडणार

तुषार सोनवणे
Wednesday, 2 September 2020

परिक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी केंद्र आणि राज्यसरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार पश्चिम रेल्वेदेखील अतिरिक्त लोकल ट्रेन सोडणार आहे

मुंबई - मुंबई परिसरातील जेईईच्या विद्यार्थ्यांसाठी केंद्र आणि राज्य सरकारने सोमवारी लोकल ट्रेन प्रवासाची परवानगी दिली होती. या परिक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी केंद्र आणि राज्यसरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार पश्चिम रेल्वेदेखील अतिरिक्त लोकल ट्रेन सोडणार आहे

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील जेईई आणि नीट सारख्या परिक्षांना सार्वजनिक वाहतूक सेवेअभावी विद्यार्थ्यांना मुकावे लागू नये यासाठी सोमवारी लोकल ट्रेनमध्ये प्रवास करण्याची मुभा देण्यात आली होती. आता पश्चिम रेल्वे जेईई परिक्षेसाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी 1 ते 6 सप्टेंबर या कालावाधीत 46 अतिरिक्त ट्रेन सोडणार आहे.  पश्चिम रेल्वे मार्गावर या आधी 350 ट्रेन धावत आहेत. या ट्रेन सोडून अधिकच्या 46 ट्रेन असणार आहेत.पश्चिम रेल्वे विभागाच्या अधिकृत ट्वीटर हॅंडलवरून ही माहिती देण्यात आली आहे.

मोठी बातमी! राज्यांतर्गत रेल्वे प्रवासी वाहतूक सेवेला हिरवा कंदील; उद्यापासून सुरू होणार बुकिंग

महामुंबईमध्ये जेईई ची परिक्षा देणारे सुमारे 27 हजार विद्यार्थी आहेत. तर नीट परिक्षा देणारे 40 हजार विद्यार्थी आहेत. विद्यार्थ्यांकडे उपलब्ध असलेल्या प्रवेशपत्रावरच त्यांना लोकल ट्रेनमध्ये प्रवासास परवानगी मिळणारआहे. सोमवारी लोकलप्रवासास परवानगी देतानाही रेल्वेने ही बाब स्पष्ट केली होती. जेईई ची परिक्षेव्यतिरिक्त अन्य प्रवाशांना प्रवासाची मुभा नसणार आहे.

--------------------------------------


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: western railway will run 46 additional special suburban services in mumbai from 1st september to 6th september jee exam students