

Borivali To Virar 5th and 6th Railway line Project
ESakal
मुंबई : पश्चिम रेल्वेवरील बोरिवली ते विरारदरम्यान पाचव्या आणि सहाव्या मार्गिकांचे काम रेंगाळले आहे. प्रकल्पाला सुरुवात होऊन दोन वर्षांपेक्षा जास्त काळ झाला असून, केवळ १८ टक्के काम पूर्ण झाले आहे. विविध तांत्रिक आणि प्रशासकीय कारणांमुळे या महत्त्वाच्या प्रकल्पाची गती मंदावली आहे.