

Prabhadevi Encroachment | फोटो - विजय बाटे
ESakal
मुंबई : मुंबईतील प्रभादेवी परिसरातील झोपड्यांवर पश्चिम रेल्वे प्रशासनाकडून तोडक कारवाई केली जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. प्रभादेवी येथील १०१ अतिक्रमणांवर ही कारवाई केली जात असून या कारवाईच्या विरोधात रहिवाशांकडून निदर्शने केली जात आहेत. या पाडकामाच्या मोहिमेच्या पार्श्वभूमीवर परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.