ओल्या काजूगरांची भाजीला स्वस्ताईची फाेडणी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 13 मार्च 2020

रोहा : यंदा ओले काजूगर उशिराने बाजारात विक्रीसाठी आले होते. त्यामुळे त्यांचा भाव शेकडा 300 रुपये होता. आता आवक वाढली असल्याने हा भाव निम्म्याने कमी झाला आहे. सध्या ते बाजारात 100 ते 150 रुपयांनी विकण्यात येत आहेत. 

नक्की वाचा : मुंबई रो रो मुहूर्त गाठणार का? 

रोहा : यंदा ओले काजूगर उशिराने बाजारात विक्रीसाठी आले होते. त्यामुळे त्यांचा भाव शेकडा 300 रुपये होता. आता आवक वाढली असल्याने हा भाव निम्म्याने कमी झाला आहे. सध्या ते बाजारात 100 ते 150 रुपयांनी विकण्यात येत आहेत. 

नक्की वाचा : मुंबई रो रो मुहूर्त गाठणार का? 

कोकणातील खवय्ये हापूस आंब्यासारखीच ओल्या काजूगरांची प्रतीक्षा करतात. अनेकांसाठी तर यापासून तयार केलेले पदार्थ म्हणजे शाही मेजवानी असते. परंतु यंदा बदलत्या हवामानाचा या पिकाला मोठा फटका बसला होता. त्यामुळे बाजारात ते तब्बल एक महिना उशिराने आले. 
पंधरवड्यापूर्वी पहिल्याच हंगामात त्यांचा भाव प्रति शेकडा 300 रुपये भाव होता. आता हंगाम चांगला स्थिरावला असल्याने ओल्या गरांची आवक वाढली आहे. त्यामुळे त्यांचा भाव 100 ते 150 रुपये आहे. 

हे वाचा : मुंबई, ठाण्यात कोरोनाचा रुग्ण

ओल्या काजूगरांना मुंबई-पुण्याहून येणाऱ्या पर्यटकांची चांगली मागणी असते. त्यामुळे विक्रेते मुंबई- गोवा महामार्गावरील प्रत्येक लहान-मोठ्या गावाजवळ त्यांची विक्री करतात. मार्च ते एप्रिल महिन्यात ते कोवळे असतानाच भाजीसाठी वापरता येतात. कडधान्य, सुकट आणि मटणातसुद्धा घालतात. 

बाजारात ओले काजूगर मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामुळे ते स्वस्त आहेत. शेकडा 100 ते 150 रुपयांच्या भावाने विकण्यात येतात. पंधरवड्या पूर्वी त्यांचा भाव 300 रुपये होता. 
- धानी पवार, काजूबिया विक्रेते 

ओले काजूगर निम्म्याने स्वस्त झाले आहेत. ते चांगल्या भरलेल्या आहेत. त्यांची भाजीही खूप चविष्ट होते. त्यामुळे खरेदी केल्या. 
- श्रद्धा शिर्के, ग्राहक 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Wet cashew nut prices dropped