esakal | का झाली प्रवीण परदेशी यांची मुंबई महापालिका आयुक्तपदावरून तडकाफडकी उचलबांगडी ?
sakal

बोलून बातमी शोधा

का झाली प्रवीण परदेशी यांची मुंबई महापालिका आयुक्तपदावरून तडकाफडकी उचलबांगडी ?

परदेशी यांची नगरविकास विभागाच्या अप्पर मुख्य सचिव पदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या जागी नगरविकास विभागाचे प्रधान सचिव आणि जलसंपदा विभागाचा अतिरीक्त भार असलेले इक्‍बाल चहल यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

का झाली प्रवीण परदेशी यांची मुंबई महापालिका आयुक्तपदावरून तडकाफडकी उचलबांगडी ?

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मुंबई : मुंबई महानगर पालिका आयुक्त प्रविणसिंह परदेशी यांची आज तडकाफडकी बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी वरीष्ट सनदी अधिकारी इक्‍बाल चहल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मुंबईत कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने मंत्रीमंडळांची त्यांच्यावर नाराजी असताना मुंबई भेटीवर आलेल्या दोन्ही केंद्रीय पथकांशी शहरातील कोरोनाच्या वाढत्या रुग्ण संख्येवर नाराजी व्यक्त केली होती. या नाराजीचे कारण करुन त्यांची बदली झाली असल्याची शक्‍यता आहे.

देशातील सर्वाधिक रुग्ण हे मुंबईत आढळले आहे.काही वस्त्या भागांपुरता मर्यादित असलेला कोराना शहरभर पसरला आहे. महानगर पालिकेचा प्रशासकीय पातळीवर गोंधळ सुरुच आहे.23 एप्रिल रोजी केंद्रीय पथकाने मुंबईतील कोरोना साथीचा आढावा घेतला होता.त्यानंतर गुरुवारी (ता.7)केंद्रीय सह सचिव लव अगरवाल यांच्या नेतृत्वाखालील पथक मुंबईत आले होते. त्यावेळी त्यांनी रुग्ण संख्या कमी होत नसल्याबद्दल नाराजी वक्त केली असल्याचे समजते. या नाराजीचे कारण पुढे करत परदेशी यांची बदली करण्यात आली आहे. मात्र, त्यांच्या कामगाजावर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यासह संपुर्ण मंत्रीमंडळही नाराज होते. तसेच, ते विधानसभेची विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत विश्‍वासू असल्याचे मानले जाते.

अरे बापरे ! "जून आणि जुलैमध्ये येणार कोरोनाची मोठी लाट"
 

परदेशी यांची नगरविकास विभागाच्या अप्पर मुख्य सचिव पदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या जागी नगरविकास विभागाचे प्रधान सचिव आणि जलसंपदा विभागाचा अतिरीक्त भार असलेले इक्‍बाल चहल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. परदेशी यांच्याकडे जलसंपदा विभागाचा अतिरीक्त भारही सोपविण्यात आला आहे.

दोन अतिरीक्त आयुक्तांचीही उचलबांगडी : 

आयुक्तांबरोबरच अतिरीक्त आयुक्त आबासाहेब जऱ्हाड, जयश्री भोज यांचीही बदली करण्यात आली आहे. जऱ्हाड यांच्या कार्यपध्दती बद्दल पुर्वीपासूचन नाराजी होती. त्यातच, मुंबई शहर विभागाची जबाबदारी त्यांच्यावर होती. भायखळा, वरळी आणि धारावी परीसरातच कोरोनाचे रुग्ण सर्वाधिक आहेत. त्याचा फटकाही त्यांना बसला. त्यांच्या जागी ठाण्याचे आयुक्त संजय जयस्वाल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जऱ्हाड यांना मदत व पुनर्वसन विभागाच्या सचिव पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. जयश्री भोज यांच्या जागी मुंबई मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनच्या माजी व्यवस्थापकिय संचालक अश्‍विनी भिडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 

क्या बात हैं ! 18 वर्षीय अर्जुन देशपांडेच्या कंपनीत रतन टाटांची गुंतवणूक, अर्जुनच्या बिझनेसमुळे टाटा इम्प्रेस...

हा वादही आहे

राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता यांचे आणि प्रविण परदेशी यांचे संबंध पुर्वी पासूनच ताणलेले होते. तर इक्‍बाल चहल हे मेहता यांच्या विश्‍वासातील मानले जातात. परदेशी आणि मेहता यांच्यातील शितयुध्दाचे नमुने गेल्या तीन महिन्यात अनुभवायला मिळाले आहेत.

परदेशींच्या बदलीसाठी ही कारणं आहेत महत्वाची

  • महापालिका रुग्णालयातील कर्मचार्यांना कोरोनाची बाधा होणे
  • भायखळा, वरळी, धारावीत कोरोना अटोक्‍यात आणण्यासाठी आलेले अपयश
  • नियोजनाच्या पातळीवर गोंधळ दुकाने सुरु ठेवण्याचा घोळ निर्माण झाला
  • सायं येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात कोविड मृतदेहांच्या बाजूलाच रुग्णावर उपचार करण्याचे प्रकार उघड झाला.


तरीही भिडे यांना संधी
मेट्रो रेल्वे कारशेडसाठी आरे वसाहतीतील झाडांच्या कत्तलीवरुन ठाकरे कुटूंबियांची नाराजी भिडे यांनी ओढावून घेतली होती. ही कत्तल करणाऱ्यांची बदली करुन अशी घोषणा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकी पुर्वीच केली होती. त्यानुसार त्यांची बदलही झाली. मात्र, कोरोनासाठी तयार करण्यात आलेल्या महापालिकेच्या  कोअर टिममध्ये भिडे यांचा समावेश होता. तर, आता त्यांना थेट महापालिकेतच संधी देण्यात आली आहे. 

what are the reasons behind transfer of praveen paradeshi from the post of BMC commissioner