तयार थर्माकोल मखरांचे करायचे काय? 

शर्मिला वाळुंज 
रविवार, 12 ऑगस्ट 2018

ठाणे : राज्य सरकारने थर्माकोल वापरावर बंदी आणल्याने सार्वजनिक उत्सवातील सजावटीवर मर्यादा आल्या आहेत. सजावटकारांसह नागरिकांनी या बंदीचे स्वागत केले असले, तरी थर्माकोलला पर्यायी वस्तूंचा शोध घेतला जात आहे. दुसरीकडे, थर्माकोलच्या तयार मखरांचे करायचे काय, असा प्रश्‍न लघु उद्योजकांना पडला असून यंदा मोठा आर्थिक फटका बसणार असल्याची चिंता त्यांना सतावत आहे. 
गणेशोत्सवाच्या काही दिवस आधी बाजारपेठ सजावटीच्या साहित्याने सजली असली, तरी सजावटकारांकडून त्याची तयारी आठ ते नऊ महिने आधीच सुरू होते. 

थर्माकोल मखर कारखान्यांत तर कारागीर दहा महिने आधी कामाला सुरुवात करतात. थर्माकोलचे खांब, अन्य नक्षीदार जाळ्या, मखरावरचा कळस असे भाग बनविले जातात. गेल्या काही वर्षांत मोठ्या थर्माकोल मखरांना मागणी वाढली होती. त्यानुसार सात ते आठ फूट उंचीचे मखर तयार करण्याचे काम कारखान्यात जवळपास पूर्ण झाले आहे. या कामासाठी जास्त वेळ आणि शारीरिक क्षमता लागत असल्याने ही कामे सुरुवातीलाच करून घेतली जातात. मात्र सरकारने बंदी लागू केल्यामुळे या तयार थर्माकोल मखरांचे आता काय करायचे, असा प्रश्‍न उद्योजकांना पडला आहे. 

सरकारने मार्चमध्ये थर्माकोलवर बंदी घालत तीन महिन्यांत मखरांची विक्री करण्यास सांगितले; परंतु या दिवसांत मखरांची विक्रीच होत नाही. आता पूर्णतः बंदी असल्याने उद्योगातील नुकसान आणि तयार मखरांचे काय करायचे, हे सरकारनेच आम्हाला सांगावे. 
- राजेश दाभाडे, उद्योजक. 

बंदीमुळे मखरांची किंमत शून्य झाली आहे. या बंदीमुळे लाखोंचा फटका बसला आहे. सरकारने किमान यंदाच्या गणेशोत्सवापुरती आम्हाला सूट द्यावी, अशी आमच्या असोसिएशनची मागणी आहे. 
- निशिकांत मोडक, उद्योजक. 

थर्माकोलवर कलाकुसर करण्याचे काम अनेक वर्षे करत आहे. या कामासाठी लागणारे भांडवल आमच्याकडे नसते. आम्ही व्यापाऱ्यांकडून भांडवल घेऊन त्यांना आवश्‍यक असलेल्या मालाचा पुरवठा करतो. थर्माकोलवर बंदी आल्याने आता व्यापारी आमच्याकडून तो माल घेऊन जाण्यास तयार नाहीत. 
- मनसुख जलानी, कलाकार. 

Web Title: What to do with thermocol made of glaze