esakal | आदित्य ठाकरेंच्या 'त्या' ट्विटचा नेमका अर्थ काय?, राऊतांनी केलं रिट्विट
sakal

बोलून बातमी शोधा

आदित्य ठाकरेंच्या 'त्या' ट्विटचा नेमका अर्थ काय?, राऊतांनी केलं रिट्विट

सोनूनं मातोश्रीवर जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीनंतर आदित्य ठाकरेंनी एक ट्विट केलं आहे. सोनूसोबतचा फोटो शेअर करुन एका चांगल्या व्यक्तीला भेटलो असं ट्विटमध्ये म्हटलं आहे. यामुळे या ट्विटमधून आदित्य ठाकरेंनी संजय राऊत यांना एक प्रकारचा घरचा आहेर दिल्याची सध्या चर्चा सुरु झाली.

आदित्य ठाकरेंच्या 'त्या' ट्विटचा नेमका अर्थ काय?, राऊतांनी केलं रिट्विट

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई- अभिनेता सोनू सूद यानं केलेल्या कामावर रविवारी सामनाच्या रोखठोक सदरातून टीका करण्यात आली आहे. सोनूनं लॉकडाऊनच्या काळात इतर राज्यात अडकलेल्या मजुरांना त्यांच्या घरी पाठवण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली. यावरुन शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी याबाबत अनेक प्रश्न उपस्थितीत केले. सामनातून टीका केल्यानंतर रविवारी रात्री उशिरा सोनूनं मातोश्रीवर जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीनंतर आदित्य ठाकरेंनी एक ट्विट केलं आहे. सोनूसोबतचा फोटो शेअर करुन एका चांगल्या व्यक्तीला भेटलो असं ट्विटमध्ये म्हटलं आहे. यामुळे या ट्विटमधून आदित्य ठाकरेंनी संजय राऊत यांना एक प्रकारचा घरचा आहेर दिल्याची सध्या चर्चा सुरु झाली आहे. 

मोठी बातमी - मुंबईत शाळांचे ऑनलाईन वर्ग 15 जूनपासून?

रविवारी रात्री उशिरा सोनू सूद याने मातोश्रीवर जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी तिथे मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख तसेच पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे देखील उपस्थित होते. सोनू मातोश्रीवर पोहोचले, तेव्हाही संजय राऊत यांनी, अखेर सोनू सूद महाशयांना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा पत्ता सापडला, 'मातोश्री'वर पोहोचले, असं ट्विट केलं होतं. दुसरीकडे सोनू यानेही मातोश्रीवर जाण्याआधीच ट्वीट करीत आपली भूमिका मांडली. 

या भेटीचा फोटो आदित्य ठाकरे यांनी ट्विट केला. या ट्विटमध्ये त्यांनी म्हटलं की, अधिकाधिक लोकांना मदत करण्यासाठी आपण एकत्र राहू या, मजबूत राहू या. लोकांना मदत करण्यासाठी एका चांगल्या व्यक्तीची या निमित्ताने भेट झाली. इतकंच काय तर संजय राऊत यांनी आदित्य ठाकरे यांचं ट्विट रिट्विटही केलं आहे. 

लेखात काय म्हटलं संजय राऊतांनी

शिवसेनेचं मुखपत्र 'सामना'त लिहिलेल्या रोखठोक या स्तंभात राऊत यांनी सोनू सूद प्रकरणावर सविस्तर भाष्य केलंय. सोनू सूदला पुढे करत ठाकरे सरकार अपयशी ठरवण्याचा प्रयत्न केला जातोय असं राऊत यांनी आपल्या लेखात म्हटलं आहे. 

ठाकरे सरकारला अपयशी ठरवण्याचा प्रयत्न 

महाराष्ट्राला सामाजिक चळवळीची मोठी परंपरा आहे. यात महात्मा ज्योतिबा फुले यांच्यापासून ते बाबा आमटेंपर्यंत अनेकांची नावं आहेत, आता यामध्ये सोनू सूदचं नाव घेतलं जाईल. मजुरांना त्यांच्या घरी जाण्यासाठी मदत करताना सोनूची छायाचित्र, व्हिडीओ प्रसिद्ध झाले. सरकार मजुरांना पोहचवण्यात अपयशी ठरलं, पण सोनूसारखे महात्मा हे काम किती सहजतेने करत आहेत असा प्रचार समाजमाध्यमांमध्ये सुरु झाला. खऱ्या कलाकाराला पडदाच लागतो असे नाही, हे महात्मा सूद याने दाखवून दिले, अशी खोचक टीका या सदरातून केली आहे.

एकीकडे पावसाळा दुसरीकडे कोरोना, मुंबईकरांनो पावसाळ्यात 'अशी' घ्या काळजी...

सोनू सूदचा चेहरा पुढे करून महाराष्ट्रातले काही राजकीय घटक ‘ठाकरे सरकार’ला अपयशी ठरवण्याचा प्रयत्न करत होते. सोनू सूद हा ‘महाबली’, :बाहुबली’ किंवा ‘सुपरहीरो’ आहे असे चित्र रंगवण्यात हे राजकीय पक्ष काही प्रमाणात यशस्वी झाले. भारतीय जनता पक्षातील काही लोकांनी सोनूला दत्तक घेतले ( हे दत्तक विधान गुप्त पद्धतीने झाले.) आणि त्याला पुढे ठेवून उत्तर भारतीय मजुरांत घुसण्याचा प्रयत्न झाला.