esakal | मुंबईतील परिस्थिती नक्की कशी आहे? जाणून घ्या डॉ. ओक यांच्याकडून...
sakal

बोलून बातमी शोधा

मुंबईतील परिस्थिती नक्की कशी आहे? जाणून घ्या डॉ. ओक यांच्याकडून...

कोरोनाचा सर्वत्र कहर पाहायला मिळतोय. स्टेट टास्क फोर्सचे प्रमुख डॉ. संजय ओक म्हणतात की मुंबईत कोरोना संसर्गाने आपला उच्चांक पुर्ण केला आहे.

मुंबईतील परिस्थिती नक्की कशी आहे? जाणून घ्या डॉ. ओक यांच्याकडून...

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई- कोरोनाचा सर्वत्र कहर पाहायला मिळतोय. स्टेट टास्क फोर्सचे प्रमुख डॉ. संजय ओक म्हणतात की मुंबईत कोरोना संसर्गाने आपला उच्चांक पुर्ण केला आहे. सध्या मुंबईतील मृत्यूचे प्रमाण झपाट्याने वाढत असले तरी, टास्क फोर्सच्या प्रमुखांच्या म्हणण्यानुसार येत्या काळात मृत्यूदरात घट होईल. 

मुंबई परिसरातील बातम्यांचा आढावा घेण्यासाठी क्लिक करा

मुंबईतील मृत्यूचे प्रमाण झपाट्याने वाढत असताना, टास्क फोर्सच्या प्रमुखांच्या म्हणण्यानुसार,  नवीन घटनांची संख्या, डबलिंग रेट, रिकव्हरी रेट आणि मृत्यू दर - तीन आठवड्यांपासून सकारात्मक आहेत. तसेच, पावसाळ्यात प्रत्येक व्यक्तींनी आपली जास्त काळजी घेतली पाहिजे. त्यांनी हेही म्हटले की सध्या मुंबईतील ज्या भागात संसर्ग वाढत आहे. त्या भागात पावसाळ्यात जास्त काळजी घ्यावी लागेल.

डाक विभागातील कोरोना बाध‍ितांच्या मदतीसाठी राज्यपालांचा पुढाकार; एक लाख रुपयांची मदत... 

केंद्र सरकारच्या अंदाजानुसार, मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मुंबईतील बाधितांचा आकडा 75,000 आकडा पार करणार होता. मात्र मे महिन्याच्या अखेरपर्यंत शहरात फक्त 39,444 रुग्णांची नोंदणी झाली आणि आणि सोमवार 22 जून रोजी 67,635 बाधितांची नोंद झाली.

अपेक्षित सर्वोच्च आकडा विचारात घेऊन डॉ ओक म्हणाले, जूनच्या पहिल्या आठवड्यात टास्क फोर्सला दिवसाला 3,000 हून अधिक प्रकरणांची अपेक्षा होती. मात्र सध्या शहरामध्ये दिवसाला एक हजार प्रकरणांपेक्षा सरासरी किंचित वाढ होत आहे. याचा अर्थ असा नाही की आपण आधीच धोक्याच्या बाहेर आहोत. तरीही शक्य तेवढ्या खबरदारी घेत आपण लढत राहिलं पाहिजे.

300 युनिटपर्यंत वीजबिले माफ करा! भाजपची राज्य सरकारकडे मागणी 

टास्क फोर्सनुसार, मुंबईच्या डबलिंग रेट मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात 13 च्या तुलनेत आता 37 दिवसांवर आहे. तर डॉ. ओक यांच्या मते मुंबईतील बाधितांच्या सर्वोच्च आकड्यांचा बिंदू आता पुर्ण झाला आहे. म्हणजेच मुंबईतील बाधितांचा पीक येऊन गेला आहे. आता रुग्णांच्या रिकव्हरी रेटमध्ये बरीच सुधारणा झाली आहे. हे 50 टक्के आहे आणि महिन्याच्या अखेरीस ते 70 टक्क्यांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.

loading image
go to top