esakal | 300 युनिटपर्यंत वीजबिले माफ करा! भाजपची राज्य सरकारकडे मागणी

बोलून बातमी शोधा

 300 युनिटपर्यंत वीजबिले माफ करा! भाजपची राज्य सरकारकडे मागणी}
  • वीज देयकांना स्थगिती न दिल्यास आंदोलनाचा भाजपाचा इशारा
300 युनिटपर्यंत वीजबिले माफ करा! भाजपची राज्य सरकारकडे मागणी
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा


मुंबई ः राज्यात तीन महिने लॉकडाऊन असूनही वीज कंपन्यांनी ग्राहकांना अव्वाच्या सव्वा बिले पाठवली आहेत. त्यामुळे सरकारने या बिलांना माफी किंवा स्थगिती न दिल्यास तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा भारतीय जनता पक्षाने दिला आहे. 

दहावी बारावीच्या निकालाची तारिख ठरली? या तारखेपर्यंत होणार जाहीर; वाचा

प्रदेश भाजपचे सरचिटणीस आमदार अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून ही मागणी केली आहे. गेले तीन महिने राज्यातील दुकाने, हॉटेल, व्यवसाय, खासगी कार्यालये बंद आहेत. तरीही खासगी व सरकारी वीज कंपन्यांची मोठी बिले वीज ग्राहकांना आली आहेत. एकीकडे घरमालकांनी भाडेकरूंकडून घरभाडे घेऊ नये, कंपन्यांनी कामगारांना पूर्ण वेतन द्यावे, असे सरकार सांगते. अशा स्थितीत तीन महिने वीज ग्राहकांची देयकेही तहकूब करावीत किंवा माफ करावी अशी मागणी भातखळकर यांनी केली आहे. 

राज्यात 103 कोरोना चाचणी प्रयोगशाळा, चाचण्यांची संख्या वाढणार

प्रधानमंत्री आर्थिक पॅकेज मध्ये राज्य सरकारच्या वीज वितरण कंपन्यांकरिता 90 हजार कोटींचे अर्थसहाय्य उपलब्ध करून दिले आहे. तरीही वीज देयके माफ करण्याची भूमिका शासन घेत नाही हे केवळ दुर्दैवी नाही तर संतापजनक आहे अशी टीकाही आमदार भातखळकर यांनी या पत्राद्वारे केली आहे. जादा बिले पाठविणाऱ्या वीज वितरण कंपन्यांवर सरकारने तात्काळ कारवाई करून वीज देयकांना स्थगिती द्यावी. एकीकडे कोरोनाच्या संकटाचा सामना करत असताना नागरिकांना आर्थिक दिलासा मिळण्याकरिता, 300 युनिटपर्यंत वीज देयके माफ करण्याची मागणी सातत्याने होत होती. तरीही शासनाने त्याकडे दुर्लक्ष केले आहे.

तब्बल 22 कोटी 70 लाख रुपये खर्चूनही कोरोनाचा नियंत्रणात नाही, मुंबईकर विचारतायत चाललंय काय ?

अशा स्थितीत महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोग कायद्यातील कलम 4 प्रमाणे राज्यातील सर्व वीज देयकांना तात्काळ स्थगिती द्यावी व 300 युनिटपर्यंत वीज देयके माफ करून नव्याने वीज देयके पाठवावीत, अशी मागणी भातखळकर यांनी केली आहे. याबाबत राज्य सरकार कडून कोणतीही कार्यवाही न झाल्यास आंदोलन करण्याचा इशाराही भातखळकर यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या या पत्रात दिला आहे.