राज्यसभा निवडणुकीत 'बविआ' कोणाच्या बाजूनं? हितेंद्र ठाकुरांनी स्पष्टच सांगितलं

राज्यसभा निवडणुकीत घोडेबाजार होण्याची चर्चा सुरु आहे.
MLA hitendra thakur
MLA hitendra thakur esakal

मुंबई : राज्यातील राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी आता चांगलीच चुरस निर्माण झाली आहे. यामध्ये आता अपक्षांचा घोडेबाजार होण्याच्या चर्चाही रंगल्या आहेत. यापार्श्वभूमीवर बहुजन विकास आघाडीचे (बविआ) नेते हितेंद्र ठाकूर यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

MLA hitendra thakur
बूस्टर डोससाठी CORBEVAX ला परवानगी; DCGI नं दिली मंजूरी

ठाकूर म्हणाले, आमचा ९० सालापासूनचा हाच अजेंडा राहिलेला आहे की, कोणता पक्ष आणि कोणतं सरकार आमच्या मतदारसंघाचा विचार करतंय त्याच्या विकासासाठी प्रयत्न करतंय त्यानुसार आम्ही त्यांना पाठिंबा देतो. आमचा पालघर जिल्हा तीन विभागात वाटला गेला आहे. एकीकडे सागरी भाग, गुजरातच्या बाजूचा काही भाग ज्यामध्ये नागरिक सुविधा पाहिजेत तर काही भाग हा डोंगराळ आहे तिथल्या लोकांचे प्रश्न वेगळे आहेत. या सर्व गोष्टींमध्ये कोणतं सरकार मदत करतंय यावर आमची त्यांना मदत राहते.

MLA hitendra thakur
गडकरींची मोठी घोषणा; लॉन्च करणार इलेक्ट्रिक ट्रॅक्टर आणि ट्रक!

मी हाऊसमध्ये एकदा भाषण केलं होतं की, गोपिनाथ मुंडेंच्या सांगण्यावरुन मी धनंजय मुंडेंना मत दिलेलं आहे, इतकी आमची भूमिका स्पष्ट आहे. त्यामुळं मी सर्व पक्षांना मत दिलं आहे. मला कुणाची अॅलर्जी नाही, कोणताही पक्ष माझ्यासाठी अस्पृश्य नाही. माझ्यासाठी महत्वाचा आमचा तालुका-जिल्हा आहे. यामध्ये आम्हाला कोण कशी साथ देतंय हे माझ्यासाठी महत्वाचं आहे, अशा प्रकारे या संपूर्ण निवडणुकीत बहुजन विकास आघाडी काय भूमिका घेतेय हे हितेंद्र ठाकूर यांनी स्पष्ट केलं आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com