
दिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूतची माजी व्यवस्थापक दिशा सालियन हिच्यावर सामूहिक बलात्कार करून तिची हत्या केल्याचा आरोप तिचे वडील सतीश सालियान यांनी केला आहे. या प्रकरणाची नव्याने चौकशी करण्यात यावी, यासाठी त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. याचिका दाखल करण्याचे काम अद्याप सुरू असल्याचे सतीश सालियान यांचे वकील निलेश ओझा यांनी ‘सकाळ’ला सांगितले. या याचिकेमुळे या प्रकरणाला वेगळे वळण लागण्याची शक्यता आहे.