'XXX' व्हॉट्सऍप ग्रुप ऍडमिनला अटक

whatsapp
whatsapp

मुंबईः जगभरात माहितीची देवाण-घेवाण करण्यासाठी व्हॉट्सऍपचा मोठा वापर केला जातो. सोशल मीडियाचे फायदे तेवढे तोटे याप्रमाणे एका ग्रुपचा वापर अश्लिल गोष्टींसाठी चालत होता. एका महिलेला तिची परवानगी न घेता XXX या ग्रुपवर ऍड केल्यामुळे ग्रुपच्या ऍडमिनला अटक करण्यात आली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुश्ताक अली शेख (वय 24) असे अटक करण्यात आलेल्या व्हॉट्सऍप ग्रुपच्या अॅडमिनचं नाव असून, त्याला सायन-धारावी परिसरातून अटक केली आहे.

मुश्ताक अली शेख हा XXX नावाच्या एका ग्रुपचा अॅडमीन आहे. त्याने एका महिलेची परवानगी न घेता XXX या ग्रुपमध्ये ऍड केले होते. आपल्या मित्रांपैकी कोणीतरी गंमत म्हणून या ग्रुपवर ऍड केले असावे, असे प्रथम वाटले. परंतु, त्या ग्रुपवरील नको त्या गोष्टी पाहील्यानंतर खरा प्रकार लक्षात आला आणि तिने तत्काळ माटुंगा पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली. प्राथमिक चौकशीत ग्रुप अॅडमीनचा क्रमांक पश्चिम बंगालमधील असल्याचे समजले. अॅडमिनला अटक करण्यासाठी पोलिसांचे पथक पश्चिम बंगालला रवाना होण्याच्या तयारीत असतानाच तो क्रमांक सध्या मुंबईतच असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी त्याला सायन-धारावी परिसरातून अटक केली. आपण त्या महिलेला ओळखत नाही. परंतु, तो क्रमांक माझ्या नातेवाईकाचा असल्याचे मला वाटले अन् चुकून त्या महिलेला ग्रुपमध्ये ऍड केले, अशी माहिती मुश्ताकने प्राथमिक चौकशीत दिली आहे.

दरम्यान, संशयित आरोपीला अटक करण्यात आली आहे. ‘आयटी अॅक्ट 2000’ अंतर्गत त्याला पाच वर्षांची शिक्षा होऊ शकते. मुश्ताक अली शेख हा पश्चिम बंगालमधील सुतार असून, कामाच्या शोधात तो मुंबईत आला होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com