
Lack of Facilities e-rickshaw Mumbai
esakal
मुंबई : मुंबईतील ८५ टक्के ऑटो-रिक्षा आणि टॅक्सीचालकांना इलेक्ट्रिक वाहनांबद्दल माहिती असली तरी चार्जिंग सुविधा, वित्तीय सहाय्य आणि अपुऱ्या पायाभूत सुविधांमुळे अनेकांनी इलेक्ट्रिक वाहनांचा पर्याय स्वीकारलेला नाही. परिणामी मुंबईत शाश्वत सार्वजनिक वाहतूक प्रणाली निर्माण करण्याची प्रक्रिया मंदावत असल्याचे व्हील्स ऑफ चेंज अहवालातून समोर आले आहे. शहरात जलद चार्जिंग आणि बॅटरी अदलाबदलीचे जाळे तयार करण्याची गरज व्यक्त करण्यात आली आहे.