'त्या' मंत्र्यावर अद्याप कारवाई का नाही?, भाजपचा ठाकरे सरकारला रोखठोक सवाल

सिद्धेश्वर डुकरे
Tuesday, 23 February 2021

अद्यापही या मंत्र्यांविरुद्ध ठाकरे सरकारने कारवाई का केली नाही असा रोखठोक सवाल भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला आहे.

मुंबई:  तरुणीच्या आत्महत्येचा आरोप असलेले आणि लपून बसलेले राज्य सरकारमधील एक मंत्री आज 15 दिवसानंतर वाजतगाजत प्रकट झाले. विविध प्रसिद्धी माध्यमांमधून त्या मंत्र्याच्या समर्थकांचा जल्लोष आणि गाड्यांची मिरवणूक राज्यातील जनतेने पाहिली. विशेष म्हणजे आज एका वृत वाहिनीवर त्या मंत्र्यांचे आत्महत्या केलेल्या तरुणी सोबतचे फोटोही प्रसिद्ध झाले आहेत. मग अद्यापही या मंत्र्यांविरुद्ध ठाकरे सरकारने कारवाई का केली नाही असा रोखठोक सवाल भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला आहे.

त्या मंत्र्यांच्या विरोधात एवढे पुरावे समोर येऊनही अजून काय सिद्ध होणे बाकी आहे ? राज्य सरकार अजूनही ढिम्मपणे बघ्याची भूमिका का घेत आहे. राज्य सरकार त्या प्रकरणावर कोणताही गुन्हा नोंदवून घेण्यास का तयार नाही आहे? असे सवालही चंद्रकात पाटील यांनी उपस्थित केले आहेत. 

मुंबई विभागातल्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

सत्तेचा गैरवापर करून कायदा खिशात घालण्याची परिसीमा या ठाकरे सरकारने ओलांडली असल्याची टीका करताना ते म्हणाले की, या सर्व घडामोडी महाराष्ट्राच्या जनतेसमोर सुरु असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार गप्प का आहेत?  महाराष्ट्राच्या अस्मितेचे संरक्षण तुमच्याकडून अपेक्षित असताना तुम्ही आपल्याच मंत्रीमंडळातील एका आरोपीला वाचवत असल्याचा आरोप करतानाच पाटील यांनी स्पष्ट केले की, त्या तरुणीच्या कुटुंबियांना न्याय मिळत नाही तो पर्यंत आम्ही गप्प बसणार नाही. गुन्हेगाराला शिक्षा झालीच पाहिजे अशी मागणीही त्यांनी केली.

हेही वाचा- मुंबईत विनामास्क फिरणाऱ्यांना 1000 रुपये दंड? मुंबई पोलिसांचं स्पष्टीकरण

--------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

When action taken against sanjay rathod Chandrakat Patil questions Thackeray government


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: When action taken against sanjay rathod Chandrakat Patil questions Thackeray government