माझे 'ते' फोटो व्हायरल करणाऱ्या सरनाईकांवर कारवाई कधी; सोमय्यांचा सवाल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Kirit Somaiya on Pratap Sarnaik

माझे 'ते' फोटो व्हायरल करणाऱ्या सरनाईकांवर कारवाई कधी; सोमय्यांचा सवाल

मुंबई : खासदार नवनीत राणा यांचे लिलावतीमधील MRI फोटोवरून शिवसेनेने जोरदार गदारोळ केला आहे. या सर्वामध्ये भाजप नेते किरीट सोमय्यांनी गृहमंत्र्यांना थेट प्रश्न विचारत मंत्रालयात माझे फोटो काढणाऱ्या प्रता सरनाईकांवर कधी कारवाई करणार? अशा आशयाचे पत्र ट्वीट करत सवाल उपस्थित केला आहे.

सोमय्यांनी केलेल्या ट्वीटमध्ये नवनीत राणा हॉस्पिटल फोटोवर गदारोळ करणाऱ्या माफिया सेनेचे नेते मंत्रालयातील माहिती अधिकारा खाली फाईलचे निरीक्षण करायला मी गेलो असताना गैरकायदेशीररित्या माझे फोटो काढून व्हायरल करणाऱ्या प्रताप सरनाईक वर गृहमंत्री श्री दिलीप वळसे पाटील केव्हा कारवाई करणार ? असा प्रश्न सोमय्यांनी उपस्थित केला आहे. तसेच मंत्रालयात फोटो काढणे मनाई आहे. त्यामुळे प्रताप सरनाईक (Pratap Saranaik) यांच्यावर राज्याचे गृहमंत्री कारवाई कधी करणार? असा सवाल भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला.

हेही वाचा: कुतूब मिनारला 'विष्णू स्तंभ' घोषीत करा; हिंदू संघटनेची मागणी

पत्रात नेमकं काय?

मंत्रालयात नगरविकास विभागात माहिती अधिकार अंतर्गत 24 जानेवारी 2022 रोजी मी फाईलचे निरीक्षण करण्यासाठी आलो होतो. नगरविकास विभागाने मला अधिकृत वेळ आणि जागा दिली होती. माहिती अधिकाराअंतर्गत मी निरीक्षण करत होतो. त्यावेळी शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक गैरकायदेशीररित्या माझ्या जवळ आले एवढेच नव्हे तर खूर्ची ओढून माझ्या शेजारी बसले. परंतु, माहिती अधिकाराखाली अर्जदार फाईलचे निरीक्षण करत असताना बाहेरील व्यक्ती अशा पद्धतीने जवळ येऊ शकत नाही. तसेचते काय पाहतात ते बघू शकत नसल्याचे सोमय्यांनी म्हटले आहे. दरम्यान, आपण प्रताप सरनाईकांच्या घोटाळ्याची फाईल पाहत असताना त्यांनी असे मुद्दामून तिथे येणं आणि तेथील अधिकाऱ्यांना धमकावणे हे कायद्याचे भंग करणारे आहे. त्याशिवाय सरनाईक आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आपले फोटो काढून ते व्हायरल केल्याचा आरोप सोमय्यांनी पत्रात केला आहे.

Web Title: When Action Will Be Taken Against Pratap Sarnaik Says Kirit Somaiya

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top