भाजप शांत असतानाच मुख्यमंत्र्यांच्या पत्नी कडाडल्या

दिनेश गोगी
सोमवार, 16 एप्रिल 2018

उल्हासनगर : ज्यांच वय धर्म जाणून घेण्याबाबत अनभिज्ञ आहे अशा अल्पवयीन मुलींवर बलात्कारांच सत्र वाढले आहे आणि यावर भाजपा मूग गिळून गप्प बसली असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस कडाडल्या आहेत. त्यांनी बलात्काऱ्यांना फाशीचीच शिक्षा द्यावी. त्यांना फासावरच लटकावले पाहिजे. अशी उघड आणि जाहिर मागणी उल्हासनगरात मेडिकल असोसिएशनने आयोजित केलेल्या कार्यक्रमात केली आहे. यावेळी 915 डॉक्टर उपस्थित होते.

काल रविवारी उल्हासनगर मेडिकल असोसिएशनचा 49 स्थापना दिवस शहीद अरुणकुमार वैद्य टाऊन हॉल मध्ये संपन्न झाला. असोसिएशनचे प्रमुख पदाधिकारी डॉ. राजू उत्तमानी, डॉ.प्रकाश नाथानी, डॉ.हरेश जग्यासी, डॉ.करिष्मा बालानी, डॉ.सुनील भोसले, डॉ.राजेश कुकरेजा, डॉ.प्रकाश कौरानी यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस ह्या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या.

मृत्यूशय्येवर असणाऱ्या आजारी व्यक्तींना जीवनदान देण्यासाठी प्रत्येकाने मृत्यूपूर्वी अवयवदान करणे ही काळाची गरज आहे.असा संदेश देताना ज्या प्रकारे कोवळ्या अल्पवयीन ज्यांना काहीच समजत नाही अशा मुलींवर बलात्काराच्या आणि त्यांना ठार मारण्याच्या घटना वाढल्या आहेत.त्याचा समाचार घेताना अशा नराधमांना फासावरच लटकावले पाहिजे.असे परखड मत व्यक्त केले.महापौर मिना आयलानी,माजी आमदार कुमार आयलानी,पालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.राजा रिजवानी या प्रसंगी उपस्थित होते.

दरम्यान अमृता फडणवीस यांच्या सोबत तरुण युवती डॉक्टरांनी सेल्फी काढण्यासाठी एकच गर्दी केली होती

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: when bjp keeps quite at that time wife of chief minister talks