कोव्हिड रुग्णालयांमधील लूटमार थांबनार कधी? मनसेची उपजिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार  

गजानन चव्हाण - सकाळ वृत्तसेवा
Monday, 27 July 2020

खारघरमधील निरामय हॉस्पिटलमध्ये कोव्हिडचे उपचार करणाऱ्या रुग्णांकडून शासकीय दरापेक्षा अधिक दर आकारून लूटमार होत असल्याची लेखी तक्रार मनसेच्या शिष्टमंडळाने रायगड उपजिल्हाधिकारी दीपा भोसले यांच्याकडे केली आहे. 

 

खारघर: खारघरमधील निरामय हॉस्पिटलमध्ये कोव्हिडचे उपचार करणाऱ्या रुग्णांकडून शासकीय दरापेक्षा अधिक दर आकारून लूटमार होत असल्याची लेखी तक्रार मनसेच्या शिष्टमंडळाने रायगड उपजिल्हाधिकारी दीपा भोसले यांच्याकडे केली आहे. 

'तो' व्हिडिओ डोंबिवलीतील नव्हेच; व्हायरल व्हिडिओचं सत्य अखेर उघड...

पनवेल पालिका हद्दीतील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पालिकेने काही खासगी रुग्णालयांना कोव्हिडवर उपचार करण्याची परवानगी दिली आहे. सरकारने निश्चित केलेल्या शुल्कामध्ये उपचार करावे, असे निर्देशही दिले आहेत. मात्र, खारघर निरामय हॉस्पिटलमध्ये रुग्णास दिल्या जाणाऱ्या बिलांमध्ये आणि शासकीय शुल्कामध्ये मोठ्या प्रमाणात  तफावत आहे. यात रुग्णांची आर्थिक लूट होत असून रुग्णालयावर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी मनसेने केली आहे. 

हा दोष कुणाचा? व्हेंटिलेटरसाठी सहा तास, तर अंत्यसंस्कारासाठी 16 तासांची प्रतिक्षा....

मनसेच्या शिष्टमंडळात मनविसे जिल्हाध्यक्ष ऍड. अक्षय काशीद, उपाध्यक्ष अतुल चव्हाण, अविनाश पडवळ, प्रसाद परब, मनोज कोठारी, सचिन जाधव, रोहित दुधवडकर, पराग बालड, योगेश चिले आदी पदाधिकारी उपस्थित होते.

 

कोव्हिडचे उपचार करणाऱ्या रुग्णांकडून जास्त बिल आकारले जात नसून, सरकारने ठरवून दिलेल्या दरानुसारच बिले आकारली जात आहेत.
- डॉ. अमित थडानी, निरामय रुग्णालय, खारघर

----------------------------------------------

Edited by Tushar Sonawane 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: When will the looting in Covid hospitals stop? Written complaint of MNS to the Deputy Collector