Mumbai : मुंबईकरांचा प्रवास केव्हा आरामदायी होणार; रेल्वे प्रकल्प रखडले! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai Local Updates

Mumbai : मुंबईकरांचा प्रवास केव्हा आरामदायी होणार; रेल्वे प्रकल्प रखडले!

मुंबई : सात बेटांचे शहर असलेल्या मुंबईला देशांची आर्थिक राजधानी म्हणून ओळखली जाते आणि जवळपास दोन कोटी लोकसंख्या असलेल्या या शहराची लाईफ - लाईन म्हणजे मुंबई लोकल आहे. दर दिवशी लोकलंच्या पश्चिम, मध्य, हार्बर आणि ट्रान्स हार्बर या मार्गावर धावणाऱ्या तीन हजार पेक्षा जास्त लोकल फेऱ्यामधून आजच्या घडीला ७० लाखपेक्षा जास्त प्रवासी प्रवास करत आहे. मुंबईकरांचा प्रवास आणखी जलद गतीने व्हावा याकरिता रेल्वेच्या विकासासाठी विविध प्रकल्प आखण्यात आले आहेत. मात्र, अनेक प्रकल्प निधी अभावी आणि इतर कारणामुळे रखडत आहे.

मुंबई रेल्वे विकास महामंडळाने (एमआरव्हीसी) मुंबई उपनगरीय रेल्वेसाठी एकूण पाच प्रकल्प तयार केले. गेल्या १५ वर्षांच्या काळात एमयूटीपी प्रकल्पांमुळे लोकलच्या फेऱ्यांमध्ये ७८९ने वाढ झाली. तसेच यंदा ठाणे-दिवा पाचव्या-सहाव्या मार्गिकेचे काम पूर्ण झाले असून ३६ लोकल फेऱ्या वाढविण्यात आले आहे. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे, एमयूटीपी-३ प्रकल्पाच्या पूर्ततेनंतर तब्बल ३०० लोकल फेऱ्या वाढणार आहेत. यात वातानुकूलित लोकल फेऱ्यांचाही समावेश आहे.मात्र, रेल्वे प्रकल्पा मंजुरी मिळाली असली तरी निधी उपलब्ध होत नसल्याने आणि विकास कामात अनेक अडथळे येत असल्याने रेल्वेचे अनेक प्रकल्प रखडत जात आहे.

मुंबई उपनगरीय रेल्वेचा आढावा-

-३८५ किमी लांबीचा मार्ग

-११०३ किमी लांबीचे रुळ

- २५४ लोकल गाड्या

-३१९४लोकल फेऱ्या रोज

- लोकल डब्यांची संख्या - ३२७६

- रोज ७० लाख प्रवासी

- भारतीय रेल्वेवरील एकूण प्रवासी संख्येच्या ३३ टक्के प्रवासी

- भारतीय रेल्वेवरील एकूण उपनगरीय प्रवासी संख्येच्या ६० टक्के प्रवासी

-मुंबईचे रखडलेले रेल्वे प्रकल्प

- सीएसएमटी ते पनवेल उन्नत मार्ग - १२,३३१ कोटी रु. -

- पनवेल-विरार कॉरिडोर - ७०८९ कोटी रु.

- कल्याण-आसनगाव चौथी मार्गिका - १७५९ कोटी

- २१० एसी लोकल - १७,३७४ कोटी रु.

- गोरेगाव-बोरिवली हार्बर विस्तार - ८२६ कोटी रु.

- बोरिवली-विरार पाचवी व सहावी मार्गिका - २१८४ कोटी रु.

- कल्याण यार्ड आधुनिकीकरण - ९६१ कोटी रु.

एमयूटीपी-३

३०० वाढीव फेऱ्या, पनवेल-कर्जत नवीन उपनगरी मार्ग, विरार-डहाणू चौपदरीकरण

मंजुरी वर्ष- नोव्हेंबर २०१६, प्रकल्प किंमत १०९४७ कोटी रुपये

एमयूटीपी ३ अ

-१९१ एसी लोकल, मध्य, हार्बर आणि पश्चिम मार्गांवर संपर्क आधारित ट्रेन नियंत्रण यंत्रणा (सीबीटीसी)

मंजुरी वर्ष-जून २०१९, प्रकल्प किंमत ३३,००० कोटी रु.

एमयूटीपी-३मधील निधीची तरतूद (कोटी रुपये)

प्रकल्प - एकूण खर्च

विरार-डहाणू रोड चौपदरीकरण - ३५७८

पनवेल-कर्जत नवीन उपनगरी मार्ग- २७८२

उन्नत प्रवासासाठी

ऐरोली-कळवा दरम्यान नवीन उपनगरीय मार्ग - ४७६ कोटी

डिसेंबर २०१६ मध्ये एमयूटीपी ३ योजनेला मंजुरी

भारतीय रेल्वे - २३८ कोटी

राज्य सरकार - २३८ कोटी

प्रकल्पाची काळमर्यादा - २०२१-२२

-प्रत्यक्षात मार्गिकेच्या कामाला २०१८ पासून सुरुवात झाली. या मार्गिकेच्या हद्दीतील सुमारे एक हजारहून अधिक झोपडय़ा असून अतिक्रमण व पुनर्वसनाचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही. त्यामुळे ही मार्गिका आता २०२३ ऐवजी डिसेंबर २०२४ पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

प्रवाशांची सुविधा निश्चित वाढली आहे मात्र, प्रवासी सुरक्षा वाढवणे गरजेचे आहे. मुंबईतील गेल्या अनेक वर्षांपासून रेल्वे प्रकल्प रखडले आहे. राज्यातील रेल्वे मंत्री असताना सुद्धा मुंबई सारख्या शहरातील रेल्वे प्रकल्प पूर्ण झाले नाही. आज अनेक रेल्वे प्रकल्प निधी अभावी रखडून पडले आहे, माझी सरकारला विनंती आहे मुंबईकरांचा जलद आणि सुरक्षित प्रवासासाठी रखडलेले रेल्वे प्रकल्प तात्काळ पूर्ण करावेत.

- सुभाष गुप्ता, अध्यक्ष, रेल यात्री परिषद,