esakal | मुंबईत पावसाची दडी; तापमानात वाढ, वाचा सविस्तर
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai whether

मुंबईत पावसाची दडी; तापमानात वाढ, वाचा सविस्तर

sakal_logo
By
मिलिंद तांबे

मुंबई : मुंबई प्रादेशिक हवामान विभागाने (whether forecasting) मुंबईत (mumbai) मुसळधार पावसाचा (heavy rainfall) इशारा दिला होता. मात्र पावसाने आज दडी मारली. कधी ऊन तर कधी सावलीचा खेळ बघायला मिळाला. पावसाचे विघ्न नसल्याने मुंबईकरांना गणेश विसर्जन (Ganpati visarjan) सोहळ्याचा आनंद घेता आला.

हेही वाचा: टंचाईग्रस्त कांबे गावाला गणेशोत्सवात रोज टँकर; हायकोर्टात सरकारची हमी

मुंबईत आज सकाळ पासूनच ढगाळ वातावरण होते. काळेकुट्ट ढग दाटून आल्याने मुसळधार पाऊस पडेल असे वारंवार वाटत होते. मात्र मध्ये एखाद्या हलक्या सरी शिवाय आज पाऊस पडला नाही. त्यामुळे आज कुलाबा येथे 0.0 मिमी तर संताक्रूज येथे 1.7 मिमी तुरळक पावसाची नोंद झाली.आज ऊन - सावलीचा खेळ सुरू असल्याने मुंबईतील तापमानात किंचित वाढ झाली. कुलाबा येथे 30.8 तर संताक्रूज येथे 30.7 अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. तर किमान तापमान कुलाबा 26.0 तर संताक्रूज 25.5 अंश सेल्सियस निंदवण्यात आले. कमाल तापमानात काहीशी वाढ होण्याची शक्यता आहे. येत्या 24 तासात मुंबईत मुसळधार ते अतिमूसळधार पावसाचा इशारा कायम असून यादरम्यान वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.

loading image
go to top