तज्ज्ञ म्हणतायत 'हे' खाद्यतेल आहे तुमच्या आरोग्यासाठी परफेक्ट

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 19 फेब्रुवारी 2020

मुंबई - खाद्यतेल तुमच्या आमच्या दैनंदिन जीवनाचा आपल्या दररोजच्या जेवणाचा अत्यंत महत्वाचा भाग. अगदी पापड तळण्यापासून तर लोणचे करण्यापर्यंत आपण सर्वच खाद्यतेलाचा वापर करत असतो. खाद्यतेलाशिवाय जेवण अपूर्ण असते. मात्र नक्की कोणते खाद्यतेल वापरायला हवे? याबद्दल लोकांच्या मनात संभ्रम असतो.

मुंबई - खाद्यतेल तुमच्या आमच्या दैनंदिन जीवनाचा आपल्या दररोजच्या जेवणाचा अत्यंत महत्वाचा भाग. अगदी पापड तळण्यापासून तर लोणचे करण्यापर्यंत आपण सर्वच खाद्यतेलाचा वापर करत असतो. खाद्यतेलाशिवाय जेवण अपूर्ण असते. मात्र नक्की कोणते खाद्यतेल वापरायला हवे? याबद्दल लोकांच्या मनात संभ्रम असतो.

काही लोकांच्या म्हणण्यानुसार खुले आणि स्वस्त तेल वापरल्यामुळे हार्ट अटॅक किंवा ब्लडप्रेशर अशा प्रकारचे त्रास होऊ शकतात. म्हणून अनेक जण रिफाईन्ड खाद्यतेलाला जास्त प्राधान्य देतात. काही लोक तर डाईटिंगसाठी वेगळं खाद्यतेल वापरतात. मात्र नक्की कोणतं खाद्यतेल वापरणं आपल्या आरोग्यासाठी लाभदायी असतं याबद्दल तज्ज्ञांचे वेगवेगळे मतं आहेत.

मोठी बातमी - कोरोनामुळे आईचं पार्थिव 20 दिवस चीनमध्येच; मुंबईतील मेहरा कुटुंब म्हणतंय...

रिफाईन्ड खाद्यतेल आहे आरोग्यासाठी हानिकारक :

रिफाईन्ड खाद्यतेल हे आरोग्यासाठी लाभदायी असतं असं अनेकजण मानतात. हे तेल विविध प्रक्रियांमधून जाते आणि म्हणूनच यात फॅटचे प्रमाण कमी असतं, असंही मानलं जातं. रिफाईन्ड खाद्यतेलामुळे कोणत्याही प्रकारचे आजार होत नाहीत असं जाहिरातींमधून दाखवलं जातं. मात्र या रिफाईन्ड खाद्यतेलावर करण्यात येणाऱ्या प्रक्रियाच या तेलाला हानिकारक बनवतात. रिफाईन्ड खाद्यतेलावर करण्यात येणाऱ्या प्रक्रियेमध्ये या तेलाला मोठ्या तापमानवर ठेवलं जातं. त्याचमुळे या तेलात न्यूट्रिशनचं प्रमाण कमी असतं. त्याचबरोबर रिफाईन्ड खाद्यतेलात असलेल्या ट्रान्स फॅटमुळे आरोग्याची हानी होते. म्हणून रिफाईन्ड खाद्यतेल आपल्या आरोग्यासाठी हानिकारक असते असं आभ्यासकांचं मत आहे.  

मोठी बातमी - "कसाबच्या हातात होतं हिंदूंचं पवित्र बंधन" कसाबबद्दल राकेश मारिया म्हणतात...

कोणतं खाद्यतेल आहे आरोग्यासाठी उत्तम :

रिफाईन्ड खाद्यतेलापेक्षा उत्तम कच्च्या घाणीचे खाद्यतेल असते असं देखील काही तज्ज्ञ सांगतात. कच्च्या घाणीच्या खाद्यतेलात न्यूट्रिशनचं प्रमाण अधिक असतं. कच्च्या घाणीच्या तेलात ट्रान्सफॅट्स देखील नसतात. त्यामुळे हे तेल दैनंदिन उपयोगासाठी उपयुक्त असतं. त्याचबरोबर कच्च्या घाणीचे खाद्यतेल तयार करण्यासाठी तापमान कमी असतं. त्यामुळे हे खाद्यतेल जेवण बनवण्यासाठी आणि आरोग्यासाठी लाभदायी असतं.  

त्यामुळे आता तुम्ही खाद्यतेल जरा विचार करून निवडा. कारण तुमच्या आरोग्यासाठी योग्य खाद्यतेल निवडणे तुमची जवाबदारी आहे.

which eatable oil is better for your heart and health here is full report

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: which eatable oil is better for your heart and health here is full report