esakal | समजून घ्या लोकल ट्रेनमधुन कोणाला प्रवासाची परवानगी

बोलून बातमी शोधा

लोकल ट्रेन
समजून घ्या लोकल ट्रेनमधुन कोणाला प्रवासाची परवानगी
sakal_logo
By
दीनानाथ परब

मुंबई: कोरोना व्हायरसची साखळी मोडून काढण्यासाठी महाराष्ट्र सरकारने पुन्हा एकदा निर्बंध कठोर केले आहेत. आधी प्रवास, दैनंदिन व्यवहारामध्ये ज्या मुभा होत्या. त्या आता मिळणार नाही. लोकल सेवेला मुंबईची जीवनवाहिनी म्हटली जाते. कोरोनाच्या संकटाआधी मुंबई लोकलमधून दररोज ८० लाख प्रवासी प्रवास करायचे. पण आता वर्क फ्रॉम होम असल्यामुळे प्रवासी संख्या बरीच घटली आहे. पण 'ब्रेक द चेन' अंतर्गत कोरोनाची साखळी पूर्णपणे मोडून काढायची असल्याने आता सर्वसामान्यांचा लोकल प्रवासही बंद होणार आहे.

हेही वाचा: तु सिंगल आहेस? व्हेंटिलेटरसाठी मागितली मदत पण घडलं भलतचं

मुंबई लोकल ट्रेनमधून कोणाला प्रवास करता येईल? याबद्दल राज्य सरकारने नियम एकदम स्पष्ट केले आहेत.

जाणून घेऊया नियमावली

'ब्रेक द चेन' अंतर्गत दिलेल्या सूचनांच्या अनुषंगाने, फक्त ठराविक श्रेणीतील लोकांना 22 एप्रिल 2021 पासून 1 मे 2021 रोजी सकाळी 8 वाजेपर्यंत लोकल गाड्यांमधून (लांब पल्ल्याच्या गाड्यांशिवाय) प्रवासासाठी परवानगी असेल -

हेही वाचा: Mumbai Covid 19: कोविडच्या दुसऱ्या लाटेत मुंबई बेहाल

१. सर्व शासकीय कर्मचारी (राज्य / केंद्र / स्थानिक) - तिकीट / पास अ च्या आधारे देण्यात येतील , ओळखपत्र पाहून

२. सर्व वैद्यकीय कर्मचारी (डॉक्टर / पॅरामेडिक्स / लॅब तंत्रज्ञ / रुग्णालय व वैद्यकीय क्लिनिक कर्मचारी इत्यादी) , संबंधित रुग्णालय वा आंनधित विभागाने दिलेल्या ओळखपत्राच्या आधारे तिकिट / पास दिलं जाणार

३ वैद्यकीय उपचारांची आवश्यकता असणारी कोणतीही व्यक्तीला परवानगी दिली जाईल . तसेच रुग्णासोबत एक व्यक्तीला प्रवासासाठी सोडलं जाईल .

लोकल गाड्यांची तिकिटे फक्त काउंटरद्वारे दिली जातील.

पुढील सूचना मिळे पर्यंत जेटीबीएस, एटीव्हीएमएस आणि यूटीएस अॅपद्वारे तिकीट काढता देण्यात येणार नाही .