डॉक्टरांच्या राहण्याची व्यवस्था केलेल्या हॉटेल्सचे बिल भरायचे कोणी? वाचा सविस्तर...

संजय घारपुरे
Saturday, 25 July 2020

मुंबई महापालिकेने दर पाठवताना रुम शेअरींगचा उल्लेख केला नव्हता, असेही सांगितले जात आहे. आता बीकेसी कोव्हिड केंद्र आणि महापालिका आधिकारी याबाबत जबाबदारी घेत नसल्याचे दिसत आहे.

मुंबई ः मुंबईत कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सुरु झाल्यापासून अनेक डॉक्टर घरी न जाता कर्तव्य बजावत आहे. कुटुंबियांना कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून डॉक्टरांची राहण्याची व्यवस्था संबंधित रुग्णालयानजीकच्या हॉटेलमध्ये करण्यात आली होती.  मात्र आता अनेक दिवस उलटून गेले तरी बहुतांश डॉक्टरांच्या निवासाचे बिल मिळाले नसल्याची तक्रार हॉटेलचालकांनी केली आहे.

महाड तालुक्यात कोरोनाचा फैलाव थांबता थांबेना; आज सापडले तब्बल 'इतके' रुग्ण...

हॉटेल ललीतमध्ये सेवन हिल्स रुग्णालयातील तसेच वांद्रे कुर्ला संकुल कोव्हिड केंद्रातील काही डॉक्टरांच्या मुक्कामाची व्यवस्था होती. त्याचे बिल मिळाले नसल्याचे सांगितले जात आहे. महापालिकेचे अधिकारी आणि सेवन हिल्स रुग्णालय व्यवस्थापनाने हॉटेलमधील ज्या अधिकाऱ्यांबरोबर याबाबत चर्चा केली होती, त्यांनी राजीनामा दिला आहे. हॉटेलने आम्हाला बीलच आकारणे चूकीचे आहे. आमच्या डॉक्टरांच्या व्यवस्थेची जबाबदारी महापालिकेवर होती, असे सेव्हन हिल्स रुग्णालयाने म्हटले आहेत. 

लॉकडाऊनचा असाही होतोय गंभीर परिणाम, शरीरातील 'हे' व्हिटॅमिन होतंय कमी​

हॉटेलने बीकेसी केंद्रास सुमारे 60 लाखाचे बिल पाठवले होते. हॉटेलने सिंगल ऑक्यूपन्सी रुम देत असल्याचे सांगितले होते. मुंबई महापालिकेने दर पाठवताना रुम शेअरींगचा उल्लेख केला नव्हता, असेही सांगितले जात आहे. आता बीकेसी कोव्हिड केंद्र आणि महापालिका आधिकारी याबाबत जबाबदारी घेत नसल्याचे दिसत आहे. आम्ही केंद्राच्या प्रमुखांनी सांगितल्यानुसार रुम देण्यास हॉटेलला सांगितले होते, तर केंद्र प्रमुख आम्ही केवळ निवास व्यवस्था आवश्यक असलेल्या व्यक्तींची यादी दिली होती, असे सांगितले. सेवन हिल्स रुग्णालयाने महापालिकेच्या नियमानुसारच सिंगल ऑक्यूपन्सी आणि रुम शेअरिंगचा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले.
---
संपादन : ऋषिराज तायडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: who will pay hotels bill where covid care centres doctors stays