

Maharashtra Legislative Council Shivsena Nomination
ESakal
महाराष्ट्र विधान परिषदेतून उद्धव ठाकरे यांच्यासह नऊ सदस्य निवृत्त होत असून त्यांचा कार्यकाळ मे महिन्यात संपत असल्याने नवीन सदस्यांबाबत चर्चा सुरू झाली आहे. निवृत्त होणाऱ्या सदस्यांमध्ये उद्धव ठाकरे यांच्यासह नीलम गोऱ्हे, शशिकांत शिंदे, अमोल मिटकरी, गोपीचंद पाडळकर, रणजीतसिंग मोहिते-पाटील, राजेश राठोड, प्रवीण दटके आणि रमेश कराड यांचा समावेश आहे, पण महाराष्ट्रात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या कोणत्या महिला नेत्याला विधान परिषदेत प्रवेश मिळणार, हा प्रश्न आहे.