
Mumbai 7/11 Blast Case: मुंबईत २००६ मध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटानं देश हादरला होता. या स्फोटांमध्ये १८० पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झालेला तर ४०० पेक्षा जास्त जण गंभीर जखमी झाले होते. या प्रकरणी मकोका विशेष न्यायलयानं १२ जणांना शिक्षा सुनावली होती. या शिक्षेविरोधात आरोपींनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मुंबई उच्च न्यायालयाने ६ महिन्यांच्या सुनावणीनंतर सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केलीय. तब्बल १९ वर्षांनी या प्रकरणी दोषी ठऱलेले आरोपी निर्दोष ठरवण्यात आले असून त्यांना तात्काळ सोडण्याचे आदेश न्यायालयाने दिलेत.