सुशांत सिंह मृत्यू प्रकरणी मुंबई पोलिसांनी FIR का दाखल केला नाही? अनिल देशमुखांनी केला 'मोठा' खुलासा

सुमित बागुल
Monday, 14 September 2020

सुशांत सिंह मृत्यू प्रकरणात मुंबई पोलिसांवर निशाणा साधला गेला. सातत्याने मुंबई पोलिसांनी याप्रकरणी FIR का दाखल केला नाही? याबाबतही विचारणा करण्यात येत होती

मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणात सध्या CBI तपास करतेय. सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर या प्रकरणावरून राज्यात आणि देशातही मोठं राजकारण रंगलं. या प्रकारावरून अजूनही राज्यात वादंग सुरु आहे. 

सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास कुणी करावा याबाबत थेट सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला आणि त्यानंतर हे प्रकरण CBI कडे सोपवण्यात आलं. दरम्यान सध्या सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात विविध तपास यंत्रणांकडून तपास सुरु आहे. यामध्ये CBI सोबत ED आणि NCB देखील तपास करतेय. अभिनेत्री रिया चक्रवर्तीला ड्रग्स प्रकरणी अटकही करण्यात आलेली आहे.

मोठी बातमी -  कंगना गेली 'मनाली'ला आणि शिवसेनेकडून कंगनाबद्दल आली 'मोठी' प्रतिक्रिया

मात्र, या सर्व घडामोडींमध्ये अगदी सुरवातीपासून सातत्याने एक प्रश्न मुंबई पोलिसांना विचारला जात होता, तो प्रश्न म्हणजे सुशांत सिंह राजपूत प्रकरणात मुंबई पोलिसांनी FIR का दाखल केला नाही. यावर महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी उत्तर दिलं आहे. 

सुशांत सिंह मृत्यू प्रकरणात मुंबई पोलिसांवर निशाणा साधला गेला. सातत्याने मुंबई पोलिसांनी याप्रकरणी FIR का दाखल केला नाही? याबाबतही विचारणा करण्यात येत होती. आज अखेर महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी याबाबतचं मौन सोडलंय.

मुंबई पोलिसांनी सुशांत सिंह प्रकरणात FIR का दाखल केला नाही यावर अनिल देखमुख म्हणालेत की, "जेव्हा सुशांत सिंह राजपूतच्याच्या वडिलांसह त्याचे सर्व कुटुंबीय इथे मुंबईला आले होते तेंव्हा त्यांनी त्यांनी स्वतः सांगितलं होतं आणि स्वतः लिहून दिलं होतं की, सुशांतची आत्महत्या आहे आणि आमचा कुणावरही संशय नाही, असं सुशांतच्या वडिलांनी लिखित दिलं होतं. एका मराठी वृत्तवाहिनीशी अनिल देशमुख बोलत होते. 

मोठी बातमी - गुंड प्रवृत्तीचे लोक सत्तेत म्हणत आदित्य ठाकरे आणि बॉलिवूड कनेक्शनबाबत आशिष शेलार म्हणतात...

सुशांतच्या वडिलांनी लिखित दिल्याने एफआयआर कुणावर दाखल करायचा? हा प्रश्न होता. जर सुशांत सिंह राजपूतच्या कुटुंबीयांनी आम्हाला सांगितलं असतं की आम्हाला अमुक कुणावर संशय आहे, तर तांत्रिक गोष्टी समजून घ्यायला पाहिजेत. तसंच काही असतं तर सुप्रीम कोर्टाने याबाबत त्यांचं निरीक्षण नोंदवलं असतं. मात्र सुप्रीम कोर्टाने मुंबई पोलिसांनी चांगला तपास केला असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलंय.     

दरम्यान, आता CBI ने सुशांत सिंह प्रकरणात हत्या  झाली की ती आत्महत्या होती याचा तातडीने तपास करत खुलासा करायला हवा असं देखील गृहमंत्री अनिल देखमुख म्हणालेत. 

why mumbai police did not lodged FIR in SSR case anil deshmukh clarified


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: why mumbai police did not lodged FIR in SSR case anil deshmukh clarified