हे वाचलंत का? मुंबईत रुग्ण घटल्याने जैविक कचराही कमी; चार महिन्यानंतर प्रमाण 'इतक्या' टक्क्यांनी खाली

भाग्यश्री भुवड : सकाळ वृत्तसेवा 
गुरुवार, 30 जुलै 2020

मुंबई शहरातील जैविक कचऱ्याचे प्रमाण चार महिन्यानंतर 38 टक्क्यांनी कमी झाले आहे

मुंबई : मुंबई शहरातील जैविक कचऱ्याचे प्रमाण चार महिन्यानंतर 38 टक्क्यांनी कमी झाले आहे. पुर्वी कोव्हिड रुग्णालय, कोव्हिड केंद्रातून रोज सरासरी 22, 023 किलो जैविक कचरा गोळा होत असे. आता या कचऱ्याचे प्रमाण 13,700 किलोपर्यंत कमी झाले आहे.  तर, पालिकेने जुलै महिन्यापर्यंत एकूण 1.92 लाख किलो जैव-वैद्यकीय कचरा गोळा केला आहे. मुंबईतील रुग्णांचे प्रमाण घटल्याने जैविक कचऱ्याचे प्रमाण कमी झाल्याचे डॉक्टर्स सांगतात. 

दहावीत पास, पण कॅन्सरच्या परीक्षेत नापास; टाटा रुग्णालयातून परीक्षा देत 'तिने' मिळवले तब्बल 'इतके' गुण

घनकचरा प्रक्रिया विभागाच्या (एसडब्ल्यूएम) आकडेवारीनूसार, जूनमध्ये शहरात 6.60 लाख किलो जैव-वैद्यकीय कचरा तयार झाला होता. मार्चच्या तुलनेत कोव्हिडचा उद्रेकही याच वेळी झाला होता. तेव्हा दररोज सरासरी 22, 023 किलो (22 मेट्रिक टन) एवढा जैविक कचरा जमा होत असे. कोव्हिड उद्रेकापुर्वी सरासरी 12,000 ते 14,000 किलो एवढा कचरा जमा होत होता. 
मार्च महिन्यात शहरात पहिल्यांदाच रुग्ण आढळला तेव्हा दररोज सरासरी 11, 230 किलो जैविक कचरा जमा होत होता. एप्रिलमध्ये 12, 675 किलो, मे महिन्यात तो वाढून 17, 631 किलो झाला आणि जूनमध्ये दररोज 22,033 किलो एवढा जैविक कचरा जमा झाला आणि जुलै महिन्याच्या 15 तारखेपर्यंत दररोज सरासरी 13,725 किलो एवढा जैविक कचरा जमा झाला आहे. त्यामूळे, गेल्या चार महिन्यानंतर जैविक कचरा गोळा होण्याचे प्रमाण कमी झाले आहे.  जैव-वैद्यकीय कचर्‍यामध्ये सिरिंज, औषधे, वापरलेले मास्क, हातमोजे, मूत्र पिशव्या, शरीरातील द्रव किंवा रक्ताने भिजलेला कापूस, कोव्हिड 19 कर्तव्यावर काम करणाऱ्या कर्मचा-यांनी वापरलेले पीपीई कीटचा समावेश आहे. 

एसटी महामंडळाकडून सोशल मीडियाचा केवळ गवगवा; संकेतस्थळावर ट्विटरलिंक नाही...

रुग्णसंख्येनूसार कचरा
गेल्या एक महिन्यापासून कोरोना रुग्णांत दररोज घट होत आहे. शहरातील कोव्हिड केंद्रात 25 जुलैपर्यंत 5,068 खाटांपैकी 67 टक्के खाटा रिक्त होत्या. तुलनेने मेच्या शेवटच्या आठवड्यात केवळ 35 टक्के खाटा रिक्त होत्या.  मुंबईतील कोरोनामुक्तीचा दरही 70 टक्क्यांहून अधिक आहे. रुग्णदुपटीचा दरही 72 दिवसांवर गेला आहे. रुग्ण कमी झाल्याने जैव-वैद्यकीय कचरा निर्मिती कमी झाली, असे पालिकेच्या अधिकाऱ्याने सांगितले.

भन्नाट ! हा अनोखा 'रक्षक' तपासणार तापमान, नाडी आणि रक्तातील ऑक्सिजनची टक्केवारी

शहात रोज 4500 मेट्रीक टन कचरा
सध्या शहरात दररोज जवळपास 4,500 मेट्रिक टन कचरा तयार होतो. आकडेवारीनुसार, कोव्हिड केअर केंद्र आणि प्रतिबंधित  इमारती आणि कंटेन्मेंट झोनसारख्या भागातून दररोज सुमारे 82 मेट्रिक टन जैववैद्यकिय कचरा आणि घनकचरा तयार होतो. के- पश्चिम वॉर्ड (अंधेरी, जोगेश्वरी) आणि एम-पश्चिम (चेंबूर) वॉर्डमध्ये सर्वाधिक 9000 किलो जैविक कचरा
आणि पी-उत्तर (मालाड) मधून 6000 किलो एवढा जैविक कचरा जमा होत आहे. 

 

नायरमध्ये आधी सर्व खाट्या पुर्ण भरलेले असायचे. आता किमान 30 टक्के खाटा रिक्त असतात. आधी लोकांना दाखल करुन घेण्यास नकार द्यावा लागत होता. पण, आता किमान 300 ते 400 खाटा रिक्त आहेत. सर्वच ठिकाणी अशीच परिस्थिती आहे. नायरमध्ये आता रुग्णांची संख्या कमी झाली आहे. त्यामुळे, सर्वच प्रकारचा कचरा कमी झाला आहे. 
- डॉ. मोहन जोशी, अधिष्ठाता, नायर रुग्णालय

पुर्वीपेक्षा जैविक कचरा कमी होण्याचे प्रमाण कमी झाले आहे. या कचऱ्यासंबंधी वेगळे नियम होते. पण, आता रुग्ण कमी झाल्यामुळे हा कचराही कमी होत आहे. 
डॉ. रमेश भारमल, अधिष्ठाता, सायन रुग्णालय

--------------------------------------------------

संपादन - तुषार सोनवणे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Why read this? Decreased number of patients in Mumbai also reduces biological waste; After four months, the proportion is down to this percentage