esakal | सीबीआय चौकशीनंतर रिया चक्रवर्ती पोलिस ठाण्यात का गेली? भाजप आमदाराने केला सवाल
sakal

बोलून बातमी शोधा

सीबीआय चौकशीनंतर रिया चक्रवर्ती पोलिस ठाण्यात का गेली? भाजप आमदाराने केला सवाल

सुशांतसिंह आत्महत्या प्रकरणाचा तपास सध्या सीबीआय करीत असून शुक्रवारी रियाची चौकशी केली होती. या पार्श्वभूमीवर भातखळकर यांनी समाजमाध्यमांवर व्हिडियो प्रसिद्ध करून वरील प्रश्न विचारले आहेत.

सीबीआय चौकशीनंतर रिया चक्रवर्ती पोलिस ठाण्यात का गेली? भाजप आमदाराने केला सवाल

sakal_logo
By
कृष्ण जोशी

मुंबई : सुशांतसिंह आत्महत्या प्रकरणातील संशयित रिया चक्रवर्ती हिची सीबीआयने शुक्रवारी जवळपास दहा तासांची मॅरेथॉन चौकशी केली. मात्र चौकशी आटोपल्यानंतर रिया थेट घरी न जाता सांताक्रूझ पोलिस ठाण्यात गेली होती. या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे असताना रिया पोलिस ठाण्यात का गेली?,  सीबीआयने तिला विचारलेल्या प्रश्नांची माहिती तिने पोलिसांमार्फत तिच्या राजकीय बॉसना दिली का?, त्यानंतर तिला तातडीने पोलिस संरक्षण का देण्यात आले?, असे सवाल भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी विचारला आहेत. 

गणेशोत्सव मंडळांच्या सामाजिक उपक्रमांवर संकट, कोरोनाचा असाही झालाय परिणाम

सुशांतसिंह आत्महत्या प्रकरणाचा तपास सध्या सीबीआय करीत असून शुक्रवारी रियाची चौकशी केली होती. या पार्श्वभूमीवर भातखळकर यांनी समाजमाध्यमांवर व्हिडियो प्रसिद्ध करून वरील प्रश्न विचारले आहेत. या सर्व प्रश्नांचा खुलासा मुंबई पोलिसांनी करावा; अन्यथा यासंदर्भात मुंबई पोलिसांचीच चौकशी करण्याची गरज आहे, असेही भातखळकर यांनी म्हटले आहे. 

दुकाने उघडू लागली तरी मुख्य 'आधार' दुरावला, अनलॉकमध्येही विक्रेते हतबल  

सीबीआय चौकशी झाल्यावर रियाला तातडीने सांताक्रूझ पोलिस ठाण्यात जाण्याची काय गरज होती. या चौकशीत तिला काय प्रश्न विचारले व तिने त्याची काय उत्तरे दिली?, हे तिच्या राजकीय बॉसना पोलिसांमार्फत कळावे यासाठी ही धडपड झाली का?. या माहितीच्या आधारे सीबीआयचा पुढील रोख कोणावर आहे? व तो टाळण्यासाठी काय करावे लागेल? याचे डावपेच आखण्यासाठी हे सर्व सुरु आहे का, अशीही शंका भातखळकर यांनी उपस्थित केली आहे. 

मुंबईतील डब्बेवाल्यांची सरकारकडे मागणी; अत्यावश्यक सेवा मानून ट्रेनमधून प्रवासास मुभा द्या, नाहीतर

या प्रकरणात रियाचे नाव संशयित म्हणून पुढे येत आहे, तरीही तिला पोलिस संरक्षण दिले आहे, त्याचा खर्च कोण करीत आहे. मूळात तिला एवढ्या तातडीने केवळ एका इन्स्टाग्राम पोस्टच्या आधारे पोलिस संरक्षण का देण्यात आले. तिला एका पोस्टच्या आधारे संरक्षण मिळाले तर सुशांतच्या नातलगांनी केलेल्या व्हॉट्सअप संदेशांच्या आधारे त्यांनाही पोलिस संरक्षण मिळणार का? किंबहुना पोलिसांनी सुशांतच्या कुटुंबियांना वेगळा न्याय का लावला?, याचीही चौकशी झाली पाहिजे, असेही भातखळकर यांनी दाखवून दिले आहे.
----
संपादन : ऋषिराज तायडे