का विषाची परीक्षा घेताय? कोरोनाकडे दूर्लक्ष केल्याने उद्धव ठाकरेंची नागरिकांवर नाराजी

तुषार सोनवणे
Sunday, 22 November 2020

 • मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज राज्यातील जनतेला समाजमाध्यमांतू संबोधित केले.
 • भाषणाची सुरूवात त्यांनी महाराष्ट्र मुंबईच्या निर्मितीमागे दिलेल्या 106 हुतात्म्यांच्या बलिदानाला अभिवादन करून केली.

मुंबई - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज राज्यातील जनतेला समाजमाध्यमांतू संबोधित केले. भाषणाची सुरूवात त्यांनी महाराष्ट्र मुंबईच्या निर्मितीमागे दिलेल्या 106 हुतात्म्यांच्या बलिदानाला अभिवादन करून केली.

हेही वाचा - मुंबईत कोरोनाची स्थिती पुन्हा चिंताजनक? कोरोनाबाधितांचा आकडा वाढतोय

मार्च पासून ते आता पर्यंत राज्यातील जनतेने कोरोनाशी लढण्यासाठी सरकारला सहकार्य केले आहे. दिवाळी, दसरा, नवरात्र तसेच इतर सर्व धर्मियांचे सण निर्बंधामध्ये साजरे झाले आहेत. परंतु आता मोठी खबरदारी घेण्याची गरज आहे. कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता आहे. ही लाट, लाट नसून त्सुनामी सारखी असू शकते त्यामुळे राज्यातील नागरिकांनी कोरोनाकडे दूर्लक्ष न करता. मास्कचा वापर, दोन हाताचे अंतर, आणि हातांची स्वच्छतेचे काटेकोर पालन करणं गरजेचं असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. लस कधी येईल हे माहित नाही परंतु सध्या आपण धोक्याच्या वळणावर उभे आहोत. त्यामुळे विषाची परीक्षा घेऊ नका असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

हेही वाचा - कोरोनामुक्त रुग्णांमध्ये आरोग्य समस्या? आरोग्याची काळजी घेण्याचे तज्ज्ञांचे आवाहन
 

मुख्यमंत्र्याच्या संबोधनातील महत्वाचे मुद्दे

 • नवरात्र, दिवाळी, इतर सर्व धर्मीय सणांना तुम्ही मी घालून दिलेल्या नियमावली आपण पाळलीत तसे यापूढेही काटेकोरपणे पालन करा 
 • प्रार्थनास्थळे खुली केली असली तरी, त्याठिकाणी गर्दी करू नका, कार्तिकी वारीनिमित्त पंढरपूरात गर्दी करू नका.
 •  
 • उत्तर भारतीय बांधवांनी गर्दी न करता केलेल्या छटपूजेचे कौतुक
 • माझे कुटूंब माझे जबाबदारी मोहिमेला यश आले. त्यामुळे राज्यातील नागरिकांच्या आरोग्याची नोंद घेता आली.
 •  
 • दिवाळीनंतर कोरोनाच्या संख्येत झपाट्याने वाढ होतेय. अमेरिका, युरोप, दिल्लीतील उदाहणे आहेत. 
 • आपण आपल्या आरोग्य यंत्रणेला किती राबवणार? त्याच्याही मर्यादा आहेत. 
 • परदेशात सध्या दुसरी लाट लाट नसून त्सुनामी सारखी आहे
 • परदेशात काही देशांनी आरोग्य यंत्रणेसह, लष्करी आणि निमलष्करी आरोग्य कर्मचाऱ्यांनाही तयारीत राहण्यास सांगितले आहे. त्यावरून या लाटेचे गांभीर्य समजू शकते.
 • दुसऱ्या लाटेत वृद्धांसह तरुणांना मोठ्या प्रमाणात संसर्ग
 • लस कधी येईल अद्यापही माहित नाही. परंतु आली तरी राज्याला 24 ते 25 कोटी डोसची गरज असेल. त्यासाठी लसीकरणाला वेळ लागू शकतो.
 • पोस्ट कोव्हिड इफेक्ट जाणवत आहेत. मेंदू, श्वसननलिका आदींचे त्रास रुग्णांना होत आहेत. त्यामुळे काळजी घेणं गरजेचं
 • निर्णय घेतला असूनही शाळा उघडता येत नाहीये. राज्यात तेवढी अनुकूल परिस्थिती तयार झालेली नाही.
 • मास्क घाला, दोन हाताचे अंतर ठेवा, सॅनिटायझर वापरा हीच त्रिसुत्री आहे.
 •  
 • का विषाची परीक्षा घेताय? सार्वजनिक ठिकाणी होत असलेल्या, गर्दीमुळे मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी.
 • लक्षण दिसत असली तर तातडीने चाचणी करा.  हलगर्जीपणा अजिबात करू नका.
 • आपले डॉक्टर आणि कर्मचारी जर रुग्णसंख्येच्या तुलनेत कमी पडले तर आपल्याला रुग्णांना वाचवणे कठिण होईल.
 • महाराष्ट्र आता मोठ्या धोकादायक वळणारव उभा आहे. लॉकडाऊन लावण्याची इच्छा नाही. त्यामुळे नागरिकांनी नियमांचं काटेकोर पालन करावं
 • सरकार आपल्या पाठीशी पूर्ण ताकदीने उभे आहे.

 

-------------------------------------------------


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Why take a poison test? Uddhav Thackeray is angry with the citizens for ignoring Corona