"वाजली का नाही तुमच्या मेमरीची घंटी?" नार्वेकरांचा राणेंवर निशाणा

नारायण राणे यांनी पत्रकार परिषदेत नार्वेकरांवर तिखट शब्दांत टीका केली होती.
Milind Narvekar_Narayan Rane2
Milind Narvekar_Narayan Rane2

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहाय्यक मिलिंद नार्वेकर (Milind Narvekar) यांच्यावर मातोश्रीवरचा 'बॉय' अशा तिखट शब्दांत टीका करणाऱ्या केंद्रीय मंत्री नारायण राणेंवर (Narayan Rane) खुद्द नार्वेकर यांनी उत्तर दिलं आहे. राणेंनी आपल्या मेडिकल कॉलेजसाठी केलेल्या फोन कॉल्सचा संदर्भ देत "वाजली का नाही तुमच्या मेमरीची घंटी?" अशा शब्दांत टोला लगावला. (Why your memores bell is not ringing Milind Narvekar targets Narayan Rane)

नार्वेकर यांनी ट्विट करत नारायण राणे यांच्यावर निशाणा साधला. ते म्हणाले, "बॉय का? अच्छा! स्वतःच्या मेडिकल कॉलेजसाठी साहेबांकडून परवानगी मिळावी म्हणून दिवसभरात सात वेळा फोन करून विनंत्या केल्याचं विसरलात? वाजली का नाही तुमच्या मेमरीची घंटी?" दरम्यान, नारायण राणेंनी नार्वेकरांना पुन्हा ट्विटद्वारे उत्तर दिलंय. राणेंनी म्हटलं, "सुशांतसिंगच्या हत्येनंतर आपल्या फोनवरून राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी दोनवेळा कॉल केला होता, हे आपण विसरलात काय? अश्या किती घटना मी आपणांस सांगू? मला बोलायला लावू नका"

नार्वेकरांनी राणेंवर का साधला निशाणा?

खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या शिवसेना भवनात शक्तीप्रदर्शन करत घेतलेल्या पत्रकार परिषदेला उत्तर देण्यासाठी नारायण राणे यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेत संजय राऊत यांच्यावर सडकून टीका केली. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहाय्यक असलेल्या मिलिंद नार्वेकर यांच्यावरही निशाणा साधला होता. राणे म्हणाले होते की, "मिलिंद नार्वेकर कोण आहे? जे पूर्वी मातोश्रीवर बॉयचं काम करायचे ते काय? माझ्या समोरची गोष्ट आहे, बेल मारली की काय आणू म्हणणारे आता नेता बनला. काय अपग्रडेशन स्पीड आहे" राणेंच्या या टीकेलाच नार्वेकरांनी ट्विटद्वारे उत्तर दिलं आहे.

Milind Narvekar_Narayan Rane2
Sanjay Raut: संजय राऊत शिवसेना संपवत आहेत, चंद्रकांत पाटलांचा आरोप

दरम्यान, नारायण राणेंच्या पत्रकार परिषदेनंतर शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी देखील काही वेळातच पत्रकार परिषद घेत नारायण राणेंवर जोरदार हल्ला चढवला. राणेंनी भाजपत दाखल होण्यापूर्वी पंतप्रधान मोदींवर केलेली टीका, तसेच भाजप नेते किरिट सोमय्या यांनी राणेंनी १०० बोगस कंपन्या स्थापन केल्याची ईडीकडे केलेली तक्रार याचा व्हिडिओसकट दाखला दिला. तसेच ईडीची चौकशी मागे लागल्यानेच नारायण राणे भाजपला शरण आल्याचा आरोपही केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com