मिठी खोलीकरण आणि रुंदीकरणासाठी आणखी 386 कोटी रुपये खर्चीले जाणार

मिठी खोलीकरण आणि रुंदीकरणासाठी आणखी 386 कोटी रुपये खर्चीले जाणार

मुंबई :  मिठी नदीच्या रुंदीकरण आणि खोलीकरणासाठी आतापर्यंत 1 हजार 400 कोटी रुपयांपर्यंतचा खर्च झाला आहे. तर, आता 386 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे. आश्‍चर्य म्हणजे महापालिकेच्या अंदाजित खर्चापेक्षा हा तब्बल 100 कोटीहून जास्त खर्च आहे.

2007 सालापासून मिठी नदीच्या रुंदीकरण आणि खोलीकरणाचे काम सुरु आहे. तसेच, नदीच्या बाजूने संरक्षक भिंत बांधून नदीत येणारे सांडपाणी अडविण्याचे काम सुरु आहे. मात्र, गेल्या 13 वर्षात हे काम संपलेले नाही.

आता, पवई फिल्टरपाडा ते बांद्रे कुर्ला संकुलातील एम टी एन एल  कार्यालयापर्यंत नदीचे रुंदीकरण, खोलीकरण बाजूने संरक्षण भिंत बांधण्यात येणार आहे. तसेच नदीच्या बाजूने सेवा रस्ते बांधून नदीत येणारे सांडपाणी आणि मैलापाणी अडविण्यासाठी वाहीन्या टाकण्यात येणार आहे. तीन टप्प्यात हे काम होणार असून सर्व कामांचा मिळून महानगर पालिका प्रशासनाने 282 कोटी 49 लाखांचा खर्च अंदाजित केला होता. मात्र, प्रत्यक्षात कंत्राटदारांनी हे काम 386 कोटी 91 कोटी रुपयांमध्ये हे काम करण्याची तयारी दाखवली आहे. तसा प्रस्ताव प्रशासनाने बुधवारी (ता.11) झालेल्या स्थायी समितीच्या पटलावर मांडला होता. मात्र,समितीने हा प्रस्ताव राखून ठेवला आहे.

मिठी नदीच्या रुंदीकरणासाठी महानगर पालिकेने आतापर्यंत 1 हजार 400 कोटी रुपयांपर्यंतचा खर्च केला आहे. हे काम गेल्या 14 वर्षांपासून सुरु आहे. मात्र, अद्याप पुर्ण झालेले नाही. रुंदीकरणात प्रमुख अडथळा हा अतिक्रमणाचा आहे. महानगर पालिकेने मिठी किनाऱ्यावरील 4 हजार 388 झोपड्या हटवल्या आहेत. तर, अद्याप 1 हजार कोटीहून अधिक झोपड्या आहेत.

असे आहे काम

  • विमानतळ टॅक्सी वे । कुर्ला ते अशोक नगर अंधेरी । अंदाजित खर्च - 71 कोटी 71लाख । प्रत्यक्ष खर्च - 96 कोटी 95 लाख 49 हजार । कंत्राटदार स्कायवे इंन्फ्राप्रोजेक्ट्स  
  • अशोकनगर अंधेरी ते फिल्टरपाडा पवई । अंदाजित खर्च - 97 कोटी 60 लाख 04 हजार । प्रत्यक्ष खर्च - 131कोटी 54 लाख 79 हजार। कंत्राटदार - स्कायवे इंन्फ्राप्रोजेक्ट्स
  • एम टी  एन एल  बीकेसी ते विमानतळ टॅक्सी वे । अंदाजित खर्च - 113 कोटी 18 लाख 23 हजार । प्रत्यक्ष खर्च - 158 कोटी 40 लाख 75 हजार ।कंत्राटदार - एस . एस असोसिएट्स  

( संपादन - सुमित बागुल ) 

for widening and deepening of mithi river additional funds of Rs 386 will be spent

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com