Amit Thackeray: अमित ठाकरे लढवणार विधानसभा निवडणूक? मोठी अपडेट आली समोर sakal
मुंबई
Amit Thackeray: अमित ठाकरे लढवणार विधानसभा निवडणूक? मोठी अपडेट आली समोर
Raj Thackeray: संदीप देशपांडे यांना मैदानात उतरवण्याची तयारी सुरु केली आहे. देशपांडे मनसेचे महत्त्वाचे कार्यकर्ते आहेत.
Latest Mns News: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांच्यापाठोपाठ ठाकरे घराण्याच्या पुढच्या पिढीतील राजकारणी, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांचे पुत्र अमित हेही विधानसभेच्या रणधुमाळीत नशीब अजमावण्याच्या तयारीत आहेत.
मनसेच्या सर्व प्रमुख नेत्यांनी त्यांनी निवडणूक लढवायला हवी, अशी भूमिका जाहीरपणे मांडली आहे.

