मुंब्र्यामध्ये आजपासून असं असणार लॉकडाऊन, प्रशासनाचा मोठा निर्णय 

मुंब्र्यामध्ये आजपासून असं असणार लॉकडाऊन, प्रशासनाचा मोठा निर्णय 

मुंबई- लॉकडाऊनचा चौथा टप्पा संपायला केवळ चार दिवस बाकी आहेत. मात्र मुंबई, ठाण्यात कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढतानाच दिसतोय. यामुळे कोरोनाला रोखण्यासाठी ठाणे प्रशासनानं मोठा निर्णय घेतला आहे. ठाणे महानगरपालिकेनं मंगळवारी 27 मे रोजीपासून मुंब्रात संपूर्ण लॉकडाऊन करण्याचे आदेश दिलेत. या लॉकडाऊनच्या काळात केवळ दूध आणि वैद्यकीय दुकानेच सुरु राहणार आहेत. या भागात आतापर्यंत 298 कोविड -19 प्रकरणे नोंदवली गेलीत.

मुंब्रामध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. लॉकडाऊन काळातही लोकं दुकानाच्या बाहेर आणि भाजीपाला बाजारात गर्दी करताना दिसत आहे. सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाचं लोकं पालन करत नसल्याचं महापालिकेनं जारी केलेल्या पत्रकात म्हटलं आहे. 

काय काय सुरु असणार 
दूध आणि मेडिकल स्टोअर वगळता कोणतंही दुकान सुरु राहणार नसल्याचं अधिकाऱ्यानं म्हटलं आहे. दुधाची दुकानंही सकाळी 7 ते सकाळी 9 पर्यंतच खुली राहणार आहेत. सोशल डिस्टन्सिंगचं पालन केल्यावरच मेडिकल स्टोअर उघडण्यात येतील. 

महानगरपालिका उपआयुक्त मनीष जोशी यांनी म्हटलं की, या लॉकडाऊनच्या काळात कोणालाही बाहेर पडू दिले जाणार नाही. लोकांना केवळ अत्यंत आपत्कालीन परिस्थितीत बाहेर जाण्याची परवानगी दिली जाईल असं त्यांनी स्पष्ट केलं आहे. 

लॉकडाऊनची अंमलबजावणी करण्यासाठी टीएमसीनं पेट्रोलिंग युनिट्सची स्थापना केली आहे. आम्ही मोठ्या जंक्शनवर बॅरिकेड लावण्याचा निर्णय घेतला आहे. तसंच मुंब्रामध्ये जास्तीत जास्त पोलिस बंदोबस्त मिळवण्याचा प्रयत्न करीत आहोत, असे जोशी म्हणाले. लोकांसाठी भाजीपास मासं, मासे घरपोच पोहोचवण्यासाठीही आम्ही व्यवस्था केली आहे. येत्या दोन ते तीन दिवसांत कोरोनाबाधितांच्या आकड्यात घट झाल्यास लॉकडाऊन शिथिल करण्यात येणार असल्याचंही जोशी यांनी सांगितलं आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com