Mumbai Election: मुंबई महापालिका निवडणूक भाजप स्वबळावर लढणार असल्याचे स्पष्ट संकेत भाजपचे खासदार नारायण राणे यांनी दिले आहेत. त्यामुळं आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत भाजप मोठा निर्णय घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. .Devendra Fadnavis: महाराष्ट्राच्या व्हिजनसाठी पहिल्या शंभर दिवसांचं टार्गेट काय? मुख्यमंत्री म्हणाले, १५ एप्रिलला....नारायण राणे नेमकं काय म्हणालेत?रत्नागिरीत गुरुवारी माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना नारायण राणे म्हणाले की, भाजप भविष्यात स्वबळावर निवडणुका लढणार आहे, पण कोणती निवडणूक आम्ही स्वतंत्र लढवू हे सांगू शकत नाही. मुंबईत भाजपची मोठी ताकद आहे, असंही त्यांनी सूचकपणे म्हटलं आहे. राजन साळवी भाजपत येणार का? याबाबत पक्ष निर्णय घेईल असंही राणे यांनी म्हटलं आहे. भाजपचे सध्या चांगले दिवस सुरु आहेत, लोकांना विकास दिसत आहे, असंही त्यांनी म्हटलं आहे..Fatima Shaikh: केंद्रात मोठी खुर्ची मिळाल्यानं...; सावित्रीबाई फुलेंच्या सहकारी फातिमा शेख यांच्याबाबतच्या आक्षेपांवर प्रतिमा परदेशींचं उत्तर.विधानसभेच्या निकालामुळं आत्मविश्वास दुणावलादरम्यान, विधानसभा निवडणुकीत भाजपला एकट्याला ऐतिहासिक यश मिळालं आहे. २८८ पैकी भाजपनं १३२ जागा जिंकून भाजपनं दणदणीत विजय मिळवला. तर भाजपप्रणित महायुतीला एकूण २३० जागा मिळाल्या आहेत. त्यामुळं सहाजिकचं भाजपचा आत्मविश्वास दुणावला आहे. त्यामुळेच आता येणाऱ्या महापालिका निवडणुकांमध्ये भाजप स्वबळावर लढण्याची चाचपणी करत असल्याची चर्चा सुरु होती. त्यातच आता नारायण राणे यांच्या विभाधानामुळं भाजप खरोखरच मुंबई महापालिकेबाबत मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जात आहे..Uddhav Thackeray: ठाकरेंना मोठा झटका! राज्यपाल नियुक्त 12 आमदार प्रकरणाची याचिका हायकोर्टानं फेटाळली.ठाकरेंची शिवसेनाही स्वबळावर?तर दुसरीकडं मुंबई महापालिका निवडणूक उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनंही स्वबळावर लढण्याचं बोलून दाखवलं आहे. खासदार संजय राऊत यांनी तसे संकेत दिले आहेत. त्यावर सुषमा अंधारेंनी देखील याबाबत उद्धव ठाकरे निर्णय घेतील असं म्हटलं होतं..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.