
Devendra Fadnavis: महाराष्ट्राचं पुढील पाच वर्षांचं व्हिजन काय असेल? याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सविस्तरपणे मांडलं आहे. पुण्यात सकाळ माध्यम समुहानं आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांनी विविध विभागांना शंभर दिवसांचं टार्गेट दिल्याचं सांगितलं. तसंच १५ एप्रिलपर्यंत या टार्गेटचं काय झालं हे कसं तपासलं जाईल याची रुपरेषाही सांगितली.