रुग्णालय कर्मचाऱ्यांचा खडा सवाल, विचारतायत महागड्या हॉटेल्सची बिलं आमचा पगाराच्या पैश्यातून भरणार का ?

sad health worker
sad health worker
Updated on

मुंबई: कोरोनाच्या सुरुवातीच्या काळात इतर देशांमधून किंवा देशांतर्गत प्रवास करून आलेल्या नागरिकांची तपासणी विमानतळावरच करण्यात येत होती. मात्र तरीही देशात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात झाला. या पार्श्वभूमीवर डॉक्टर आणि इतर आरोग्य कर्मचारी यांना सोईस्कर व्हावं म्हणून त्यांची व्यवस्था काही महागड्या हॉटेल्समध्ये करण्यात आली आहे. मात्र या महागड्या हॉटेल्सचे बिलं आमचा पगाराच्या पैश्यातून भरणार का ? असा सवाल रुग्णालय कर्मचाऱ्यांनी उपस्थित केला आहे.

डॉक्टरांची आणि इतर आरोग्य कर्मचाऱ्यांची सोय मुंबईच्या पंचतारांकित हॉटेल्समध्ये करण्यात आली आहे. या हॉटेलांनी प्रशासनाला कमी दरात हे हॉटेल उपलब्ध करून दिले आहेत. म्हणजे १५ हजार रुपये प्रति दिवस दर असणारे हॉटेल प्रशासनकडून फक्त २-३ हजार रुपये प्रति दिवस या दरानं पैसे घेणार आहे. मात्र तरीही या हॉटेलांची बिलं प्रचंड  मोठी आहेत. त्यामुळे आता आम्ही या सगळ्या बिलांचे पैसे आम्ही द्यायचा का असा प्रश्न रुग्णालय कर्मचाऱ्यांनी विचारला आहे. 

जे डॉक्टर किंवा आरोग्य कर्मचारी रुग्णालयापासून दूर राहतात, ज्यांना रोज घरी येणं आणि जाणं सोयीस्कर नाही. त्यामुळे असे आरोग्य कर्मचारी  रुग्णालयाच्या जवळ राहिले तर त्यांना त्रास होणार नाही. पालिका रुग्णालय आणि सेव्हन हिल्ससारख्या रुग्णालयांमध्ये आरोग्य सेवा देणारे, दूर राहणारे तसंच काही विलग झालेले आरोग्य कर्मचारी आणि नर्स या सुविधेचा लाभ घेत आहेत. मात्र आता या सगळ्यांची बिलं त्यांच्या वेतनामधून कापली जाणार का असा प्रश्न त्यांना पडला आहे.  

तसंच ज्या कर्मचाऱ्यांना १४ दिवसांसाठी क्वारंटाईन करण्यात आलं आहे त्यांच्या हजेरीचाही प्रश्न निर्माण झाला आहे. प्रशासनाकडून यावर समाधानकारक प्रतिक्रिया येत नसल्याचं या रुग्णालय कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे. मात्र महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी कर्मचाऱ्यांच्या पगारात कुठल्याही प्रकारची कपात होणार नाही हे स्पष्ट केलं आहे.  


will government cut salaries of hospital workers for paying hotel bills read full story

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com