esakal | Corona Effect : लॉकडाऊनमुळे मुलांच्या शिक्षणावर परिणाम, ’क्राय’चा अहवाल
sakal

बोलून बातमी शोधा

school

कोरोनाचा फैलाव थांबवण्यासाठी देशभर सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे पाच वर्षांखालील मुलांचे लसीकरण व शिक्षणावर परिणाम झाल्याचा दावा मुलांसाठी काम करणाऱ्या क्राय (चाईल्ड राईट्स अँड यू) या संस्थेने केला आहे.

Corona Effect : लॉकडाऊनमुळे मुलांच्या शिक्षणावर परिणाम, ’क्राय’चा अहवाल

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मुंबई : कोरोनाचा फैलाव थांबवण्यासाठी देशभर सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे पाच वर्षांखालील मुलांचे लसीकरण व शिक्षणावर परिणाम झाल्याचा दावा मुलांसाठी काम करणाऱ्या क्राय (चाईल्ड राईट्स अँड यू) या संस्थेने केला आहे. लॉकडाऊनच्या कालावधीत मुलांचे छंद, मैत्री, मैदानी खेळ, मनोरंजन या बाबींवरही परिणाम झाल्याचे अहवालात म्हटले आहे. 
देशातील 23 राज्ये व केंद्रशासित प्रदेशांमधील प्रत्येकी 1100 पालकांशी बोलून हा सर्वेक्षण अहवाल तयार करण्यात आला आहे. मुलांच्या शिक्षणावर परिणाम झाल्याचे 77 टक्के पालकांनी सांगितले. उत्तरेकडील 87 टक्के पालकांनी, तर पश्चिम भारतातील 56 टक्के पालकांनी हीच बाब अधोरेखित केली. मुलांचे अन्य छंद, समाजजीवन, मित्र, मैदानी खेळ यांवर लॉकडाऊनचा परिणाम झाल्याचे 60 टक्के पालक म्हणाले. 

महत्वाची बातमी : मुख्यमंत्री कार्यालयाला टॅग करत अमोल कोल्हेंनी राज्य सरकारकडे केली 'ही' मागणी 

लसीकरण रखडले
देशातील सर्व विभागांमध्ये पाच वर्षांखालील निम्म्या मुलांचे लसीकरण झाले नसल्याचे ’क्राय’च्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. उत्तर भारतातील 63 टक्के आणि पश्चिम भारतातील 40 टक्के पालकांनी ही माहिती दिली. इतर भागांत हे प्रमाण 33 टक्क्यांच्या आसपास होते. मुलांना नियमित आरोग्यसेवा व वैद्यकीय उपचार मिळाले नाहीत, असे 27 टक्के पालकांनी सांगितले.

हे वाचलत का  : अनेकांना जे जमत नाही ते 'या' तीन वर्षांच्या कबीरने केलं, पोलिसांनाही वाटलं लै भारी

स्क्रीन टाईम वाढला
घरातच बसून असल्याने मुलांचा टीव्ही, संगणक, स्मार्टफोन पाहण्याचा वेळ पुष्कळ वाढला. परंतु, मुले ऑनलाईन राहून काय करतात यावर केवळ 43 टक्के पालक लक्ष ठेवू शकले. 22 टक्के पालकांनी मुलांना ऑनलाईन राहताना कसलीही सुरक्षा दिली नव्हती, असेही सांगितले. 

नक्की वाचा : महाविकासआघाडीतल्या मंत्र्यालाच शिवसेनेकडून 'हा' खोचक सल्ला

निम्म्या पालकांकडून वेळ 
54 ते 56 टक्के पालकांनी घरगुती कामे, खेळ, गप्पा अशा माध्यमांतून मुलांना वेळ दिला; मात्र 10 टक्के पालकांना ते शक्य झाले नाही, असे ’क्राय’च्या मुख्य कार्यकारी अधिकारी पूजा मारवा यांनी सांगितले. 

लॉकडाऊन संपल्यावर तळागाळातील मुलांना आवश्यक सोईसुविधा देण्याचे काम अधिक चांगल्या प्रकारे करण्यासाठी देशभरात सर्वेक्षण करण्यात आले. पालकांनी मुलांचे वर्तन, पोषणात काही बदल होत आहे का, यावर लक्ष ठेवावे. सरकारने मुलांसाठी धोरणे ठरवताना गरीब व मध्यमवर्गीय कुटुंबांची अवस्था लक्षात घ्यावी.
- पूजा मारवा, मुख्य कार्यकारी अधिकारी, क्राय

lockdown will have an impact on children's education, CRAI reports