लॉकडाऊन : रानमेवा विकून चरितार्थ चालवणाऱ्या आदिवासी बांधवांची दैना, सरकार लक्ष घालणार?

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 19 एप्रिल 2020

लॉकडाऊनमुळे यंदा बाजारात रानमेवा दाखल झालेला नाही. त्यामुळे आदिवासींचा रोजगार पूर्णपणे ठप्प झालेला आहे. त्यामुळे सरकारने आदिवासींना अनुदान द्यावे अशी मागणी श्रमिक जनता संघाने जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्याकडे केली आहे. 

ठाणे : उन्हाळा सुरु झाला की बाजारात रानमेवा दाखल होतो. औषधी गुणधर्म असलेला हा रानमेवा  नागरिक आदिवासी बांधवांकडून खरेदी करतात. मात्र लॉकडाऊनमुळे यंदा बाजारात रानमेवा दाखल झालेला नाही. त्यामुळे आदिवासींचा रोजगार पूर्णपणे ठप्प झालेला आहे. त्यामुळे सरकारने आदिवासींना अनुदान द्यावे अशी मागणी श्रमिक जनता संघाने जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्याकडे केली आहे. 

मोठी बातमी : राज्य सरकारच्या एक निर्णय, अन् विशेष रुग्णालयांची संख्या दुप्पट

एप्रिल महिन्यात उन्हाची चाहुल लागताच बाजारात इतर फळांसोबतच रानमेवाही दाखल झालेला दिसतो. जांभूळ, करवंद, राजन, जाम, आवळा, रायआवळा आदि रानमेवा आदिवासी बांधवांकडून नागरिक मोठ्या प्रमाणात खरेदी करतात. शहापूर तालुक्यातील वासिंद, किन्हवली, डोळखांब, खर्डी, कसारा या परिसरात वास्तव्य करणारे आदिवासी बांधव जंगलांत भटकंती करुन हा रानमेवा गोळा करुन तो शहापूर, अंबरनाथ, बदलापूर, कल्याण, डोंबिवली, ठाणे शहरात विक्रीसाठी घेऊन येतात. 

हे ही वाचा...काय नवलच! व्हिडीओ कॉलिंगद्वारे त्यांनी केलं बाळाचं बारसं

यंदा मात्र लॉकडाऊनमुळे बाजारात हा रानमेवा विक्रीसाठी येऊ शकलेला नाही. लोकल सेवा बंद तसेच आदिवासी बांधवांकडे दळणवळणासाठी कोणतेच साधन उपलब्ध नसल्याने त्यांना यंदा उन्हाळ्यातील कमाईवर पाणी फेरावे लागले आहे. रानमेवा विक्रीतून दिवसाला 200 ते 300 रुपयांची कमाई हे नागरिक करीत असतात. यावर्षी लॉकडाऊनमुळे त्यांचा रोजगार ठप्प झाला असून त्यांच्याकडे उपजिविकेसाठी दुसरे कोणतेही साधन नाही. 

महत्वाची बातमी आदित्य ठाकरेंच्या मतदार संघामुळे अवघी मुंबई हादरलीये! वाचा नेमकं काय झालंय...

मुख्यमंत्र्याकडे अनुदानासाठी विनंती करणार
कष्टकरी, आदिवासी नागरिकांनाही सरकारने लॉकडाऊन काळात अनुदान द्यावे अशी मागणी श्रमिक जनता संघाचे जगदिश खैरालिया यांनी जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांना पत्राद्वारे केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही आम्ही विनंती करणार असून त्यांनाही याविषयी पत्रव्यवहार करणार असल्याचे खैरालिया यांनी सांगितले आहे.

 

 Will the government pay attention to the tribal peples who sell ranmeva

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Will the government pay attention to the tribal peples who sell ranmeva