esakal | कोरोना रुग्णांसाठी संजिवनी ठरणाऱ्या रेमडेसिवीर औषधाचे उत्पादन वाढणार; वाचा सविस्तर
sakal

बोलून बातमी शोधा

कोरोना रुग्णांसाठी संजिवनी ठरणाऱ्या रेमडेसिवीर औषधाचे उत्पादन वाढणार; वाचा सविस्तर
  • रेमडेसिवीरचे उत्पादन वाढणार, हैदराबादनंतर गुजरात आणि गोवा येथे होणार उत्पादन 
  • येत्या आठवड्यात 21,500 रेमडेसिवीर इंजेक्शन मिळणार 

 

कोरोना रुग्णांसाठी संजिवनी ठरणाऱ्या रेमडेसिवीर औषधाचे उत्पादन वाढणार; वाचा सविस्तर

sakal_logo
By
भाग्यश्री भुवड : सकाळ वृत्तसेवा

मुंबई - देशात आणि राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने रेमडेसिवीर आणि टोसीलीझुमॅब या औषधांची मोठ्या प्रमाणात मागणी वाढली आहे. मात्र, या औषधांचा उत्पादन आणि पुरवठा मर्यादित आहे. मात्र, हा पुरवठा आता वाढणार आहे. कारण, हैदराबादनंतर आता गुजरातच्या नवसारी आणि गोवा येथे उत्पादन केले जाणार आहे. 

सध्या हेट्रो रेमडेसिवीरचे उत्पादन हैद्राबादामध्ये होत आहे. आणि आता याच कंपनीचे उत्पादन नवसारी गुजरात येथे करणार आहेत. तर, सिप्ला या कंपनीच्या रेमडेसीवरचे उत्पादन बडोदा गुजरात येथे सुरू असून भविष्यात गोवा येथे करण्यात येणार आहेत. मायलॅन या कंपनीला सुद्धा या औषधांचे उत्पादन करण्यासाठी केंद्रशासनाकडून परवानगी मिळालेली आहे. यांचे ही रेमडेसीवर बाजारात लवकरच उपलब्ध होणार आहे. त्यामुळे, या औषधांचा पुरवठा वाढण्यास मदत होणार आहे. 

वाचा - मोदींच्या 'त्या' वक्तव्यावर पवारांनी केलं भाष्य, हसले आणि म्हणाले...

येत्या आठवड्यात 21,500 रेमडेसिवीर इंजेक्शन मिळणार - 

महाराष्ट्रात येत्या आठवड्यात रेमडेसीवीर या औषधांचे साधारणतः 21,500 व्हायल्स उपलब्ध होणार आहे असे उत्पादकांच्या प्रतिनिधीने यावेळी सांगितले आहे. तसेच, टोसीलीझुमॅब या औषधांची जागतिक स्तरावर अधिक मागणी असल्याकारणाने जगभरात तुटवडा निर्माण झालेला आहे. तरीसुद्धा या औषधांचा जास्तीत जास्त साठा आयात करुन राज्यात अधिक प्रमाणात साठा उपलब्ध करण्यासाठी वितरक कंपनीने प्रयत्न करावेत अशा सुचना अन्न आणि औषध प्रशासन मंत्री डाॅ. राजेंद्र शिंगणे यांनी दिल्या आहेत. 

वाचा - 'बेस्ट'च बेस्ट! लॉकडाऊन नंतर प्रवासी बसेसच्या संख्येत तब्बल 'इतकी' वाढ...

ही औषधे महाराष्ट्रभर सम प्रमाणात उपलब्ध करून देण्याचे निर्देश संबंधितांना दिले आहेत. तसेच, सध्या या औषधांचे वितरण काही ठराविक वितरकांकडून केले जाते. त्यामुळे, रुग्णांची गैरसोय होते ती टाळण्यासाठी या औषधांची विक्री अधिक वितरकांकडून करण्याच्या सुचना ही संबंधित कंपनीला दिल्या आहेत. 

डाॅ. राजेंद्र शिंगणे, अन्न आणि औषध प्रशासन मंत्री

loading image
go to top