विद्यापीठाच्या कामात हस्तक्षेप करणार नाही : विनोद तावडे

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 1 मे 2018

मुंबई : मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांनी सोमवारी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. या भेटीनंतर विद्यापीठाचे गतवैभव डॉ. पेडणेकर परत मिळवून देतील, असा विश्‍वास शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी व्यक्त केला.

यापुढे कोणत्याही कामकाजात हस्तक्षेप करणार नाही, असेही त्यांनी सांगितले. दोन वर्षांपासून शिक्षण विभागाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेला आंतरराष्ट्रीय बोर्डाच्या शाळांची लवकरच घोषणा केली जाईल, असेही तावडे म्हणाले. 

तावडे म्हणाले, ''मुंबई विद्यापीठाचा नावलौकिक वाढून प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी सरकारच्यावतीने आर्थिक व प्रशासकीय पाठिंबा दिला जाईल. नव्या कुलगुरूंकडून सरकारच्या खूप अपेक्षा आहेत, त्या ते समर्थपणे पूर्ण करतील, असेही त्यांनी म्हटले. 

सध्या रखडलेल्या निकालांमुळे विद्यार्थी नाराज असून मोठे आंदोलन उभारण्याच्या तयारीत आहेत. कायदा विषयाचे निकाल रखडल्याने 'स्टुडण्ट लॉ कौन्सिल' या विद्यार्थी संघटनेने बेमुदत आंदोलनाची हाक पुकारली आहे. याबाबत प्रतिक्रिया देताना निकाल लवकरच लावण्याकडे आमचे प्राधान्य राहील, असे सांगितले. 

तासभर चर्चा 
कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर आणि शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्यात जवळपास तासभर विविध विषयांवर चर्चा झाल्याचे समजते. तावडे यांनी कुलगुरूंना 'यू कॅन विन' आणि 'तुकाराम दर्शन' ही पुस्तकेही भेट दिली आहेत.

Web Title: Will not interfere in Mumbai University, says vinod tawde