"कोरोनावरील लस गरिबांना मोफत देणार का ?" आता मुख्यमंत्र्यांनीच दिलं उत्तर

"कोरोनावरील लस गरिबांना मोफत देणार का ?" आता मुख्यमंत्र्यांनीच दिलं उत्तर

मुंबई : गेलं वर्षभर सर्वांना बळजबरी घरात डांबणाऱ्या कोरोना विरुद्धची लस आता अखेर आली आहे. आज भारतात पहिल्या टप्प्यातील लसीकरणाला मोठ्या उत्साहात सुरवात करण्यात आली आहे. अशात भारतात केलं जाणारं लसीकरण हे जगभरात सर्वात मोठं लसीकरण ठरणार आहे.

महाराष्ट्रात देखील विविध जिल्ह्यांमध्ये लसीकरणाला सुरवात झाली आहे. लसीकरणाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील वांद्रे कुर्ला कोविड केअर सेंटर आता जंबो लसीकरण सेंटरमध्ये रूपांतरित करण्यात आलं आहे. याच लसीकरण केंद्रातून आज मुंबईतील लसीकरणाला मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सुरवात झाली.

पुढील काही दिवसांमध्ये पहिल्या टप्प्यातील लसीकरण पूर्ण करण्यात येणार आहे. मुंबईतील लसीकरणाचा शुभारंभ करण्यासाठी आलेल्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राला आपल्या भाषणांमधून संबोधित केलं. यावेळी महाराष्ट्रात गरिबांना लस मोफत देणार का हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न विचारण्यात आला. 

महाराष्ट्रात कोरोना लस दिली जाणार का, यावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणालेत की, "लसीची किंमत किती असेल याबद्दल केंद्राकडून कोणतीही माहिती मिळाली नाही. कोरोना काळात लढा देणाऱ्या कोविड योद्ध्यांना सर्वात ही लस देण्यात येणार आहे. केंद्र सरकारकडून राज्य सरकारांना अद्याप लस मोफत देण्याबाबत कोणतीही सूचना आलेली नाही. केंद्राकडून याबाबतची भूमिका आली की आम्ही पुढचा निर्णय घेऊ."

दरम्यान केंद्राच्या सूचनेनुसार महाराष्ट्रातही तीन टप्प्यांमध्ये लसीकरण पार पडणार आहे. यामध्ये पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी, दुसऱ्या टप्यात अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी आणि तिसऱ्या टप्प्यात पन्नास वर्षापेक्षा वरील नागरिकांना लस देण्यात येणार आहे. 

will poor people get free vaccine in maharashtra cm uddhav thackeray gave answer

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com