कुबेराची मायानगरी मुंबईत मुस्लिम आणि ख्रिश्चन बांधव उभा करतायत राम मंदिरासाठी निधी

कुबेराची मायानगरी मुंबईत मुस्लिम आणि ख्रिश्चन बांधव उभा करतायत राम मंदिरासाठी निधी

मुंबई, ता. 16 : प्रभू श्रीरामांना सेतू बांधण्यासाठी खारीने शेपटीतून माती आणून मदत केल्याच्या आख्यायिकेप्रमाणे राममंदिर निर्मितीसाठी भाविकांकडून अगदी दहा रुपयांपासून निधी गोळा करण्याचे काम राष्ट्रीय स्वयंसेवक संघ तसेच विश्व हिंदू परिषदेतर्फे मुंबईत केले जात आहे. मुंबईत अनेक मुस्लिम आणि ख्रिस्ती नागरिकांनी देखील यासाठी आर्थिक मदत केल्याचे संयोजकांनी सांगितले.   

देशभराप्रमाणेच कुबेराची मायानगरी असलेल्या मुंबईतूनही राममंदिर निर्मितीसाठी देणग्या स्वीकारण्याची मोहीम सुरु करण्यात आली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि विश्व हिंदू परिषद यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे नेते आणि कार्यकर्ते आपली पदे बाजूला ठेऊन यात काम करीत आहेत. मुंबईत संघ, परिषद तसेच भाजपचे पाच लाख स्वयंसेवक या कामासाठी 15 जानेवारीपासून एक महिना प्रयत्न करणार आहेत. 

प्रभू श्रीराम हा साऱ्या देशवासियांच्या श्रद्धेचा आणि संस्कृतीचा विषय असून अयोध्येतील राम मंदिरासाठी शेकडो वर्षांची कठोर तपश्चर्या भाविकांनी केली आहे. त्यामुळे मंदिर निर्माणासाठी एक दोघांकडून नव्हे तर साऱ्या हिंदूंकडून अगदी दहा रुपयांपासून देणगी घेण्याचे लक्ष्य ठरविण्यात आले आहे. जेणेकरून हे मंदिर माझे आहे व त्याच्या निर्मितीत माझाही वाटा आहे, ही सुखद जाणीव प्रत्येक भारतीयाला होईल, असे या मोहिमेतील मुंबई भाजपचे समन्वयक पवन त्रिपाठी यांनी सकाळ ला सांगितले. प्रत्येक रामभक्ताने आपली विचारधारा बाजूला ठेऊन या मोहिमेत सहभागी व्हावे असे आवाहन केले जात आहे, असेही ते म्हणाले.  

मुस्लिम, ख्रिश्चनही सहभागी

पहिल्या दिवशी दहा ते पंधरा मुस्लिम आणि ख्रिस्ती नागरिकांनीही अभिमानाने या मोहिमेला आर्थिक साह्य केले, असे दक्षिण मध्य मुंबईचे संयोजक जतीन देसाई यांनी सांगितले. येथील सहा विधानसभा मतदारसंघातील साडेतीन लाख घरांमध्ये संघाच्या रचनेनुसार पोहोचण्याचे काम केले जाईल. जमलेले धन राममंदिर ट्रस्ट कडे जमा होणार आहे. एक हजारांपेक्षा जास्त रक्कम ऑनलाईन, धनादेश आदी स्वरुपांमध्येही स्वीकारली जाईल. देणगीदारांना 80 जी नुसार आयकर सवलतही मिळेल. प्रत्येक सहकारी गृहनिर्माण संस्थेला याबाबत पत्र दिले असले तरी कोणावरही देणगीची सक्ती नाही, असेही देसाई म्हणाले. 

Muslim and christen brothers are collecting funds for the construction of ram mandir in ayodhya

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com