esakal | दोन वर्षात पालिकेच्या शाळेत प्रवेशासाठी रांगा लागतील! वाचा कोण म्हणतंय
sakal

बोलून बातमी शोधा

दोन वर्षात पालिकेच्या शाळेत प्रवेशासाठी रांगा लागतील! वाचा कोण म्हणतंय

दोन वर्षात पालिकेच्या शाळेत प्रवेशासाठी रांगा लागतील! वाचा कोण म्हणतंय

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

 मुंबई : महापालिका शाळांत अत्याधुनिक व दर्जेदार शिक्षण देण्यासाठी प्रशासन प्रयत्न करत आहे. त्यासाठी राज्य सरकार सर्वतोपरी मदत करील. महापालिका शाळांची प्रगती अशीच सुरू राहिल्यास प्रवेशासाठी दोन वर्षांत रांगा लागतील, असा विश्‍वास राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी बुधवारी (ता. 26) व्यक्त केला. 

महत्वाची बातमी : मुंबईतील आगीच्या घटना येणार नियंत्रणात!

वरळीतील सरदार वल्लभाई पटेल स्टेडियमच्या एनएससीआय सभागृहात बुधवारी दुपारी महापालिकेच्या शिक्षण विभागातर्फे "रायझिंग स्टार्स 2020' कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले; त्यावेळी आदित्य ठाकरे बोलत होते. महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढत असून; आज त्याचे प्रत्यक्ष दर्शन घडले, असे ते म्हणाले. महापालिका शाळांत प्रवेश घेण्यासाठी दोन वर्षांत रांगा लागतील, असा विश्‍वास त्यांनी व्यक्‍त केला आणि शिक्षक, पालकांचे कौतुक केले. मुलांचा विकास व्हावा, यासाठी सरकार महापालिकेच्या पाठीशी आहे, अशी ग्वाही त्यांनी दिली.

अर्थसंकल्पीय अधिवेशन संपण्याआधीच राज्यात दिशा कायदा लागू करणार - गृहमंत्री 

मुंबई महापालिका शाळांमध्ये आठ माध्यमांतून शिकवले जाते आणि तंत्रज्ञान हे नववे माध्यम आहे. एकूण 1200 शाळांमध्ये 500 "व्हर्च्युअल क्‍लासरूम' आहेत. तब्बल 47 हजार विद्यार्थी टॅबवर शिकत आहेत. 53 हजार विद्यार्थ्यांना बेस्ट बसच्या प्रवासभाड्यात सवलत दिली जाते. महापालिका शाळांमधील शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी हे प्रयत्न केले जात आहेत, असे आदित्य ठाकरे म्हणाले. महापालिका आता आयसीएसई आणि सीबीएसई शाळा सुरू करत असून, विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण देणार असल्याने पालकांनी चिंता करण्याची गरज नाही. शिक्षणात महापालिका शाळा सुधारतील आणि देशात शिक्षणात महाराष्ट्राचा क्रमांक प्रथम राहील, असेही त्यांनी सांगितले. 

"रायझिंग स्टार' सर्वत्र राबवा 
"रायझिंग स्टार'सारखा कार्यक्रम राज्यपातळीवर राबवून जिल्हा परिषद, महापालिका आणि नगरपालिका शाळांना सामावून घेण्यासाठी प्रयत्न करावा. सरकार त्यासाठी मदत करील, असे आश्‍वासन शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिले. खासदार अरविंद सावंत यांनी आपणही महापालिका शाळेत शिकल्याचे सांगितले. महापौर किशोरी पेडणेकर यांनी महापालिकेच्या मराठी शाळा कधीच बंद होणार नाहीत, अशी ग्वाही दिली. या वेळी विद्यार्थ्यांनी गाणी, क्रीडाप्रकार, नृत्ये, मल्लखांब आदी कार्यक्रम सादर केले. 

will Queues for admission in municipal school!

loading image