अनिल परब यांचे मेस्मा कारवाईबाबत मोठे विधान म्हणाले... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Anil Parab

अनिल परब यांचे मेस्मा कारवाईबाबत मोठे विधान म्हणाले...

मुंबई : एसटी संपातील (Maharashtra ST Strike) कार्मचाऱ्यांवर मेस्माअंतर्गत (MESMA) कारवाई करण्याबाबत आज झालेल्या बैठकीत चर्चा झाली. दरम्यान, या प्रकणावरील कोर्टाचा निर्णय 20 तारखेला येणार आहे, त्यानंतर कर्मचाऱ्यांवर मेस्मा (Action Against MESMA Act ) अंतर्गत करण्यात येणाऱ्या कारवाईबाबत निर्णय घेतला जाईल, अशी माहिती राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली आहे. (State Transport Minister Anil Parab).

एसटी कर्मचाऱ्यांवर मेस्मा (MESMA Act) कायद्या अंतर्गत कारवाई प्रत्यक्ष सुरु करण्याचा इशारा गेल्या आठवड्यात परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांनी दिला होता. तरीही राज्यातील एसटीच्या विविध आगारांमधे कर्मचाऱ्यांचा संप सुरुच आहे. आत्तापर्यंत 10 हजारपेक्षा जास्त एसटी कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. तर दोन हजार पेक्षा जास्त जणांची सेवा ही समाप्त करण्यात आल्याचे एसटी प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

हेही वाचा: केंद्राचे काही निर्णय चुकले असतील, मात्र हेतू चांगलाच

अनिल परब म्हणाले की, एसटी कर्मचाऱ्यांना (State Transport Employee) भरकटवल जात असून, आमचा प्राथमिक अहवाल 20 तारखेला दाखल करणार आहोत. आज झालेल्या बैठकीत आम्ही आढावा घेतला असून यामध्ये अधिकारी आणि कामगार संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. या सर्व प्रकणावरील कोर्टाचा निकाल 20 डिसेंबर रोजी येणार आहे. त्यामुळे त्यानंतर कर्मचाऱ्यांवर मेस्मा (MESMA Act) अंतर्गत कारवाई करण्याचा निर्णय घेणार आहोत. कामगारांनी कुणाचं ऐकायचं आणि कुणाचे नाही ठरवलं पाहिजे. काही लोक कामगारांची माथी भडकवत आहेत.

एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण करावे या प्रमुख मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांचे ऑक्टोबरपासून आंदोलन सुरु आहे, तर दिवाळीपासून एसटी कर्मचाऱ्यांचा प्रत्यक्ष संप सुरु केला आहे. राज्य शासनाने एसटी कर्मचाऱ्यांसाठी पगारवाढीची घोषणा केल्यावरही एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरुच राहिले आहे.

Web Title: Will Take Decision Of Mesma Action After Court Result Says Anil Parab

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Strikeanill parab