एसटी कामगारांच्या वेतनावर आज तोडगा निघणार? उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बोलवली बैठक; आर्थिक मदतीची शक्यता

एसटी कामगारांच्या वेतनावर आज तोडगा निघणार? उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बोलवली बैठक; आर्थिक मदतीची शक्यता


मुंबई ः कोरोनाच्या काऴात एसटीचे दैनंदिन उत्पन्न बुडत असल्याने एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन देणे ही कठीण झाले आहे. त्यामूळे गेल्या चार महिन्यांपासून अर्धवट वेतनच कर्मचाऱ्यांना देण्यात आले असून, भविष्यातही वेतनाची गंभीर समस्या निर्माण होणार आहे. त्यामूळे एसटी कर्मचाऱ्यांच्या संघंटनांनी आर्थिक मदतीची मागणी केल्यानंतर आता, मंगळवारी (ता.4) उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मंत्रालयातील दालनात परिवहन मंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक बोलविण्यात आल्याने, कर्मचाऱ्यांच्या वेतनावर तोडगा निघण्याची शक्यता आहे.

एसटीची आर्थिक स्थिती नाजुक असल्याने एसटी महामंडळाला ठोस आर्थिक मदत करण्याची मागणी एसटी कर्मचारी संघंटनानी केली होती. तर वेतनासाठी सुद्धा राज्य सरकारने वेगळी मदत करण्यात यावे, त्याशिवाय एसटीला राज्य शासनाचा विभाग म्हणून दर्जा द्यावा अशा ही मागण्या एसटी कर्मचारी संघंटनांनी केल्या आहे. मात्र, मंगळवारी उपमुख्यमंत्री आणि परिवहन मंत्री यांच्या उपस्थित होणाऱ्या बैठकीत यावर सुद्धा चर्चा होण्याची शक्यता आहे. 

राज्य सरकारने एसटी महांडळाच्या अधिकाऱ्यांना यापुर्वीच मागण्यां आणि एसटीला आर्थिक संकंटातून बाहेर काढण्यासाठीची अभ्यासपुर्ण टिप्पणी मागणीतली आहे. त्यावर चर्चा केली जाणार असून, त्यानंतर एसटी महामंडळाला बैठकीत पार पडलेल्या चर्चैवरील मागणीचे प्रस्ताव उपमुख्यमंत्र्यांच्या मान्यतेसाठी सात दिवसांच्या आत पाठवावे लागणार आहे. त्यानंतर राज्य सरकार एसटी महामंडळाच्या मागणीला अंतिम मान्यता मिळणार आहे.

------------------------------

संपादन - तुषार सोनवणे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com